News

वारस नोंदणी हे शब्द आपण जमिनीचे व्यवहार करताना ऐकत असतो.शेतजमीन ज्याच्या नावावर आहे ती व्यक्ती मृत झाल्यास, त्याच्या वारसांना त्या जमिनीचा हक्क मिळू शकतात. पण त्यासाठी संबंधित जमिनीवर वारसाची नोंद कशी करावी याची माहिती घेणे आवश्यक ठरते.

Updated on 24 October, 2021 12:29 PM IST

 वारस नोंदणी हे शब्द आपण जमिनीचे व्यवहार करताना ऐकत असतो.शेतजमीन ज्याच्या नावावर आहे ती व्यक्ती मृत झाल्यास, त्याच्या वारसांना त्या जमिनीचा हक्क मिळू शकतात. पण त्यासाठी संबंधित जमिनीवर वारसाची नोंद कशी करावी याची माहिती घेणे आवश्यक ठरते.

मृत खातेदाराच्या वारसाची नोंद ज्यात घेतले जाते त्या नोंदवहीस गाव नमुना 6 क असे म्हणतात. वारस नोंदी प्रथम रजिस्टर मध्ये नोंदवून वारसाची चौकशी केली जाते. त्यानंतर कोणाचे नाव वारस म्हणून  जमिनीत लावायचे या बाबत वारस ठराव मंजूर केला जातो. नंतर नोंदवहीत परत फेरफार नोंद केली जाते. वारसा बाबतची तक्रार असेल तर शेतकऱ्यांना त्यांचे म्हणणे मांडण्याची आवश्यक संधी मिळू शकते.

 वारस नोंदी साठी आवश्यक बाबी

 खातेदाराच्या मृत्यूनंतर तीन महिन्याच्या आत नोंदी करता अर्ज करणे अपेक्षित असते. आपण जो अर्ज करतो त्यामध्ये संबंधित खातेदार कोणत्या तारखेला मयत झाला, संबंधित गटातील किती क्षेत्र त्या खातेदाराच्या नावावर होते  व खातेदारास किती जण वारस आहेत त्याची माहिती देणे आवश्यक असते.

 मयत खातेदाराचा मृत्यू दाखला,त्याच्या नावावर चे 8अ चे उतारे, असलेल्या सर्व वारसांचे मयत व्यक्ती बरोबर असलेले नाते,वारसा असलेल्या व्यक्तींचे पत्ते, शपथे वरील प्रतिज्ञापत्र सादर करावे लागते. व्यक्तीचा जो धर्म आहे त्या कायद्यानुसार नोंदी घेतल्या जातात.

 वारस नोंदीची प्रक्रिया

 मयत खातेदाराच्या मयत दाखला वारसांनी सर्वप्रथम काढावा. खातेदाराच्या मृत्यूनंतर तीन महिन्याच्या आत सर्व वारसांची नावे नमूद करून वारस नोंदी साठी अर्ज करावा. नोंदीसाठी जो अर्ज प्राप्त होतो त्या अर्जाची नोंदणी  रजिस्टर मध्ये केली जाते. नंतर वारसांना बोलावले जाते. गावाचा सरपंच, पोलीस पाटील व प्रतिष्ठित नागरिक यांना वारसांनी अर्जात नमूद केलेल्या माहितीचे चौकशी केली जाते व रजिस्टर मध्ये वारस ठराव मंजूर केल्यानंतर फेरफार रजिस्टर नोंद घेतली जाते.

 त्यानंतर वारसांना नोटीस दिली जाते. किमान पंधरा दिवसानंतर  फेरफार नोंदीबाबत कायदेशीर आदेश काढलाजातो. त्यानंतर वारसांची नोंद प्रमाणित केली जाते किंवा रद्द केली जाते.

 वारस प्रमाणपत्र साठी आवश्यक कागदपत्रे

  • विहित नमुन्यातील कोर्ट फी स्टॅम्प लावलेला अर्ज व शपथ पत्र व मृत्युपत्र
  • तलाठी/ मंडळ अहवाल
  • शासकीय नोकरी असल्यास पुरावा उदा. सेवा पुस्तिकेच्या पहिल्या पानाचा उतारा
  • रेशन कार्डची प्रत
  • मृत खातेदार पेन्शन धारक असल्यास कोणत्या महिन्यापर्यंत शेवटची पेन्शन मिळाली त्या पानाची प्रत
  • ग्रामपंचायत किंवा नगरपालिका यांच्या जन्म मृत्यू चा नोंदवहीतील उतारा
  • वारसाहक्क प्रमाणपत्र व नॉमिनी ( वारसा हक्क व नॉमिनी हे वेगळे असतात)बँक, विमा रक्कम इत्यादी बाबत नॉमिनी म्हणजे मृत्युनंतर संबंधित खातेदाराचे रक्कम ज्या व्यक्तीकडे जाते किंवा देण्यात यावी असे नमूद केलेलेनाव त्यालाचतीमिळते.
  • वारसा हक्क प्रमाणपत्र व्यक्तीच्या व संबंधित व्यक्तीच्या संपत्तीवर वारस नोंद वहिवाट इत्यादी बाबींसाठी महत्त्वाचे असते.
English Summary: pls take precaution in heir registration process
Published on: 24 October 2021, 12:29 IST