News

शेतीच्या संबंधित अनेक धडाडीचे निर्णय केंद्र सरकारकडून घेतले जात असून त्यांची अंमलबजावणी देखील केली जात आहे असे सध्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांना त्यांनी पिकवलेला शेतमाल असो की शेती करताना येणाऱ्या समस्या कमी व्हाव्यात आणि शेती करणे सोपे जावे आणि उत्पादन वाढावे यासाठी बऱ्याच प्रकारचे प्रयत्न सरकारकडून करण्यात येत आहेत.

Updated on 15 July, 2022 9:46 AM IST

शेतीच्या संबंधित अनेक धडाडीचे निर्णय केंद्र सरकारकडून घेतले जात असून त्यांची अंमलबजावणी देखील केली जात आहे असे सध्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांना त्यांनी पिकवलेला शेतमाल असो की शेती करताना येणाऱ्या समस्या कमी व्हाव्यात आणि शेती करणे सोपे जावे आणि उत्पादन वाढावे यासाठी बऱ्याच प्रकारचे प्रयत्न सरकारकडून करण्यात येत आहेत.

त्याचाच एक भाग म्हणून केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी गुरुवारी इ-नाम अंतर्गत प्लॅटफॉर्म ऑफ प्लॅटफॉर्म अर्थात पीओपी लाँच केले.

एवढेच नाही तर देशातील सुमारे साडेतीन लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळावा यासाठी त्यांच्या 1018 एफ पी ओ भारतात शेतकरी उत्पादक संस्थांना 37 कोटी रुपयांहून अधिक इक्विटी अनुदान जारी करण्यात आले.

 नेमके काय आहे 'पीओपी'?

 प्लॅटफॉर्म ऑफ प्लेटफार्म मुळे शेतकरी त्यांनी पिकवलेला शेतमाल दुसर्‍या राज्यात देखील सहजपणे विकू शकतील. यामुळे खरेदीदार, अनेक देशातील बाजारपेठा आणि सेवा पुरवठादार पर्यंत शेतकऱ्यांचा डिजिटल प्रवेश वाढणार आहे.

नक्की वाचा:Maharashtra Cabinet Decision: शेतकरी ते पेट्रोल; वाचा शिंदे सरकारचे धडाकेबाज नऊ मोठे निर्णय

 एवढेच नाही तर किंमत शोध यंत्रणा आणि शेतमालाच्या गुणवत्तेनुसार भाव मिळण्यास मदत होणार आहे.बेंगलोर येथे पार पडलेल्या विविध राज्यांच्या कृषी आणि फलोत्पादन मंत्र्यांच्या परिषदेत याची सुरुवात करण्यात आली.

पीओपी वर जवळजवळ प्लॅटफॉर्मवरील 41 सेवा प्रदाता यांना समाविष्ट करण्यात आले असून विविध मूल्य साखळी सेवा जसे की,ट्रेडींग, फिनटेक,

विविध बाजारपेठेची माहिती, वाहतूक इत्यादींसाठी पीओपी एक डिजिटल इकोसिस्टीम तयार करेल. याद्वारे पीओपीच्या वापरकर्त्यांना विविध सेवा प्रदाता कडून मिळवण्याचा पर्याय देखील उपलब्ध होणार आहे.

नक्की वाचा:गोगलगायींचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी 'क्रॉपसॅप' योजना ठरणार शेतकऱ्यांसाठी वरदान

 हे शेतकरी, शेतकरी उत्पादक संस्था आणि इतर भागधारकांना एकच खिडकी द्वारे कृषिमूल्य शृंखला मधील विविध प्रकारच्या वस्तू आणि सेवा मध्ये प्रवेश करण्यास सक्षम करेल.

पीओपी मध्ये जर तुम्हाला प्रवेश करायचा असेल तर तुम्ही ई-नाम ॲप द्वारे प्रवेश करू शकतात. हे ॲप तुम्हाला तुमच्या मोबाईल मधील प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करता येईल.

यामधील जे सेवा पुरवठादार आहेत ते कृषी उत्पादनांची चाचणी, व्यापार, पेमेंट सिस्टम, लॉजिस्टिक, स्वच्छता, शेतमालाची प्रतवारी, शेतमालाची वर्गीकरण, शेतमालाचे पॅकेजिंग, स्टोरेज, मालाचा विमा, पीक अंदाज हवामान इत्यादींची माहिती प्रदान करतील.

नक्की वाचा:बुस्टर डोसबाबत मोदी सरकारची मोठी घोषणा, लोकांचा होणार फायदा!

English Summary: plateform of plateform service launch by agriculture minister narendra sing tomar
Published on: 15 July 2022, 09:46 IST