News

नागपूर: कोविड-१९ विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील लांबलेल्या कापूस खरेदीला सुरुवात करण्यात यावी. जून महिन्यात सुरु होणाऱ्या मान्सूनच्या आगमनापूर्वी कापूस खरेदीचे नियोजन करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी प्रशासनाला दिले.

Updated on 16 May, 2020 7:54 AM IST


नागपूर:
कोविड-१९ विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील लांबलेल्या कापूस खरेदीला सुरुवात करण्यात यावी. जून महिन्यात सुरु होणाऱ्या मान्सूनच्या आगमनापूर्वी कापूस खरेदीचे नियोजन करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी प्रशासनाला दिले. या बैठकीला जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, कापूस पणन महासंघाचे सरव्यवस्थापक जे. पी. महाजन उपस्थित होते.

यावेळी सूर्यलक्ष्मी कॉटन मिलमधील कामगारांचे वेतन व भत्ते अदा करण्याबाबत पालकमंत्र्यांनी निर्देश दिले. कापूस खरेदीसाठी नुकतेच ग्रेडरचे प्रशिक्षण घेण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. पणन महासंघाने कापूस खरेदी केंद्रे वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे. पाऊस सुरु झाल्यानंतर कापूस खरेदीला मर्यादा येतील म्हणून मान्सूनपूर्व कापूस खरेदी करण्याचे नियोजन करण्यात यावे, यासाठी येणाऱ्या अडचणींबाबत पणन महासंघाने प्रशासकीय यंत्रणेशी समन्वय साधावा.

English Summary: Plan to buy cotton before monsoon
Published on: 16 May 2020, 07:52 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)