News

मा. जिल्हाधिकारी श्री. पी. शिवाशंकर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने दिल्या जिल्ह्यातील विविध जिनिंग मिल्सना भेटी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ व कृषी विभागाच्या माध्यमातून पिकांवरील कीड-रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प क्रॉपसॅप अंतर्गत सर्वत्र कीड रोगाचे सर्वेक्षण करण्यात येत असून दि. २४ जुलै रोजी गुलाबी बोंड अळीचे योग्य प्रकारे व्यवस्थापन करण्याच्या उद्देशाने मा. जिल्हाधिकारी श्री. पी. शिवाशंकर यांच्या नेतृत्वाखाली अप्पर जिल्हाधिकारी श्री. अण्णासाहेब शिंदे, कीटकशास्त्र विभागप्रमुख डॉ. पुरषोत्तम झंवर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री. बाळासाहेब शिंदे, उपविभागीय कृषी अधिकारी श्री. सागर खटकाळे, कीटकशास्त्रज्ञ डॉ. अनंत बडगुजर, तालुका कृषी अधिकारी श्री. प्रभाकर बनसावडे यांच्या पथकाने जिल्ह्यातील विविध जिनिंग मिल्सना भेटी दिल्या.

Updated on 31 July, 2018 6:52 AM IST

मा. जिल्हाधिकारी श्री. पी. शिवाशंकर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने दिल्या जिल्ह्यातील विविध जिनिंग मिल्सना भेटी

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ व कृषी विभागाच्या माध्यमातून पिकांवरील कीड-रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प क्रॉपसॅप अंतर्गत सर्वत्र कीड रोगाचे सर्वेक्षण करण्यात येत असून दि. २४ जुलै रोजी गुलाबी बोंड अळीचे योग्य प्रकारे व्यवस्थापन करण्याच्या उद्देशाने मा. जिल्हाधिकारी श्री. पी. शिवाशंकर यांच्या नेतृत्वाखाली अप्पर जिल्हाधिकारी श्री. अण्णासाहेब शिंदे, कीटकशास्त्र विभागप्रमुख डॉ. पुरषोत्तम झंवर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री. बाळासाहेब शिंदे, उपविभागीय कृषी अधिकारी श्री. सागर खटकाळे, कीटकशास्त्रज्ञ डॉ. अनंत बडगुजर, तालुका कृषी अधिकारी श्री. प्रभाकर बनसावडे यांच्या पथकाने जिल्ह्यातील विविध जिनिंग मिल्सना भेटी दिल्या.

तसेच क्रॉपसॅप प्रकल्पा अंतर्गत ब्राम्हणगाव परिसरातील प्रक्षेत्र भेट देऊन सर्वेक्षण कामाचा आढावा मा. जिल्हाधिकारी यांनी घेतला. गुलाबी बोंड अळीच्या व्यवस्थापनासाठी मोठा प्रमाणात कामगंध सापळे लावण्याचे मा. जिल्हाधिकारी यांनी निर्देश दिले.

दरम्यान मौजे. मांडाखाळी ता. परभणी येथे कीटकशास्त्रज्ञ डॉ. अनंत बडगुजर, डॉ. कृष्णा अंभुरे, तालुका कृषी अधिकारी श्री. प्रभाकर बनसावडे, मंडळ कृषी अधिकारी श्री. के. एम. जाधव यांच्या पथकाने भेट देऊन पाहणी केली असता बीटी कपाशीवर गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावची सुरवात झाल्याची आढळून आले.

English Summary: Pink Bollworm incidence in Cotton Crop
Published on: 31 July 2018, 06:51 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)