News

पिंपळगाव बसवंत बाजार समिती ही कांदा व टोमॅटोसाठी प्रसिद्ध आहे. शेजारील जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यातून पिंपळगाव बाजार समितीत टोमॅटोची आवक होत असते.

Updated on 19 August, 2020 6:21 PM IST


पिंपळगाव बसवंत बाजार समिती ही कांदा व टोमॅटोसाठी प्रसिद्ध आहे. शेजारील जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यातून पिंपळगाव बाजार समितीत टोमॅटोची आवक होत असते. या हंगामातील बाजार समितीतील टोमॅटो लिलावात प्रारंभ होऊन टोमॅटोला 20 किलोच्या प्रति क्रेटला 821 रुपये भाव मिळाला. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.

 पिंपळगाव बाजार समितीत नासिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या ठिकाणांहून मोठ्या प्रमाणात टोमॅटोची आवक होते. परंतु या वर्षी धोरणाच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड अल्पप्रमाणात केली होती. त्याचा परिणाम थेट टोमॅटोच्या आवकेवर  झाला. मागच्या वर्षी याच महिन्यात 20 किलोच्या क्रेटला 740 रुपये भाव मिळाला होता,  तर सरासरी साडेतीनशे इतका भाव होता.

 

राजस्थान, पंजाब, हरियाणा या राज्यात टोमॅटो पाठवला जात असून याठिकाणी ही मागणी जास्त आहे. मागच्या वर्षी ऑगस्ट 2019 मध्ये 7, 12880 किलो टोमॅटोची आवक झाली होती. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव बाजार समितीतही टोमॅटोला आज प्रति कॅरेट सातशे रुपये ते साडे सातशेपर्यंत भाव मिळाला.

 

English Summary: Pimpalgaon Baswant Bazar - Price of tomato at Rs 821 per crate
Published on: 19 August 2020, 06:20 IST