यावर्षी खरिपातील सर्वच पिके ही पावसामुळे बऱ्याच प्रमाणात नष्ट झालीत. फक्त खरिपातील शेवटचे पिक म्हणून ओळखले जाणारे तूर हे पीक बऱ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या हातात आहे. शासनाने तुरीला या वर्षी सहा हजार तीनशे रुपयांचा हमी भाव जाहीर केला आहे.
त्यानुसार शासनाने राज्यात 186 तूर हमीभाव केंद्रे नाफेडच्या वतीने सुरू केले. त्यामुळे शेतकऱ्यांची वाढती मागणी यामुळे निर्धारित वेळेत राज्यात निर्धारित वेळेत तूर हमीभाव केंद्रे सुरू झाली पण या हमीभाव केंद्रात पेक्षा खुल्या बाजारपेठेत तुरीचे दर हे वाढलेले आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांचा ओढा हा व्यापाऱ्यांकडे जास्त आहे तर हमीभाव केंद्रे ओस पडत आहेत.
हमीभाव केंद्रांची परिस्थिती
राज्यात 186 तूर हमीभाव केंद्र सुरू करण्यात आली आहेत.तुरीच्या बाबतीत शेतकऱ्यांची लूट होऊ नयेम्हणून तुरीला आधारभूत किंमत मिळावी म्हणून ही केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.परंतु तुरीच्या दरात तब्बल हे केंद्र सुरू झाल्यानंतर 800 रुपयांनी वाढ झाली आहे.
परिणामी या केंद्रांवरील भावापेक्षा बाजारात तुरीला अधिकचा भाव मिळत आहे.त्यामुळे येथे नोंदणीसाठी कागदपत्रांची पूर्तता, पैशांसाठी लागणारा जास्तीचा कालावधी या कटकटीत न पडता शेतकरी थेट व्यापाऱ्यांकडे तुरीची विक्री करीत आहेत.
तूर पिकाची परिस्थिती
खरीप हंगामातील शेवटची पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुरीचा आवक आता सुरू झाली आहे.परंतु शेवटच्या टप्प्यात वातावरणातील बदल आणि मर रोगाचा प्रादुर्भाव यामुळे तुरीच्या उत्पादनात देखील घट आली आहे.
तुरीला सर्वसाधारण 6500 चा भाव मिळत आहे. नवीन तुरीपेक्षा जुन्या तुरीला मागणी जास्त असून शंभर ते दोनशे रुपयांचा फरक जुन्या आणि नव्या तुरीमध्ये आहे. जुन्या तुरीवर पावसाचा आणि रोगराईचा परिणाम झालेला नाही तसेच ति तुर वाळलेली आणि चांगल्या दर्जाचे असल्याचे व्यापारी सांगत आहेत.
Published on: 19 January 2022, 06:14 IST