News

बीड जिल्ह्यात यंदाच्या हंगामामध्ये शेतकऱ्यांनी तूर लागवडीला विशेष प्राधान्य दिल्याचे चित्र नजरेस आले आहे. हंगामाच्या सुरुवातीला जिल्ह्यात सर्वत्र विशेषता आष्टी तालुक्याचा परिसरात मनसोक्त पाऊस पडला होता, त्यासमवेतच कापसाचे उत्पादन क्षमतेत देखील मोठी घट झाली होती. म्हणून तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात तुर पिक लावण्याचे चित्र तालुक्यात दिसलें होते. मात्र, तुरीची लागवड झाल्यानंतर जिल्ह्यात अतिवृष्टी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली, परिणामी जास्त पावसामुळे जिल्ह्यातील विशेषता आष्टी तालुक्यातील अनेक तूर उत्पादक शेतकऱ्यांना तुरीचे उत्पादन कमी झाले. असे असले तरी, तुरीला पाहिजे तेवढा बाजार भाव प्राप्त होत नव्हता.

Updated on 24 January, 2022 6:22 PM IST

उत्पादनात घट होऊनही तुरीला चांगला बाजारभाव मिळत नसल्याने तूर उत्पादक शेतकरी पुरता चिंतेत सापडला होता. सुरुवातीला तुरीला साडेपाच हजार रुपये प्रतिक्विंटल एवढाच बाजार भाव प्राप्त होत असल्याचे तूर उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले. आता मात्र, तुरीला शासनाने ठरवून दिलेल्या हमी भावापेक्षाही अधिक बाजारभाव प्राप्त होत असल्याचे चित्र आष्टी तालुक्यात सर्वत्र नजरेस पडत आहे. शासनाने तुरीसाठी सहा हजार तीनशे रुपये प्रतिक्विंटल असा हमीभाव घालून दिला आहे, मात्र तालुक्यात सर्वत्र खाजगीमध्ये सहा हजार चारशे रुपये प्रति क्‍विंटल दराने व्यापारीवर्ग खरेदी करत आहे. त्यामुळे तूर उत्पादक शेतकऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झालाय.

का वाढले तुरीचे दर

तालुक्यातील शेतकऱ्यांनी उत्पादन वाढीच्या अनुषंगाने या हंगामात विक्रमी तुरीची लागवड केली होती, हाती आलेल्या आकडेवारीनुसार तालुक्यात जवळपास 17 हजार हेक्टर क्षेत्रावर तुर पिक लावण्यात आले होते. मात्र तालुक्यात या हंगामात अतिवृष्टीने हाहाकार माजवला होता, कधी नव्हे तो तालुक्यात विक्रमी पाऊस या हंगामात नमूद करण्यात आला. त्यामुळे तुरीच्या पीकावर याचा विपरीत परिणाम झाला व उत्पादनात खूप मोठी घट घडून आली. असे असले तरी, तुरीला या हंगामात सुरुवातीला खाजगी बाजारपेठेत अवघा पाच हजार रुपये ते साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल एवढा बाजार भाव प्राप्त होत होता. 

शासनाने तूर पिकाला या हंगामात तब्बल सहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर केला आहे, शासनाने आष्टी तालुक्यात पाच खरेदी केंद्रास मंजुरी दिली, तसेच शासनाने यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी करायला सांगितले त्यानुसार शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी देखील सुरू केली होती. मात्र ते म्हणतात ना 'सरकारी काम आणि सहा महिने थांब' अशीच गोष्ट तूर पिकाच्या हमीभावात प्रत्येक्ष खरेदी बाबत देखील झाली. तालुक्यात शासनाने प्रत्यक्ष खरेदी करण्यासाठी तब्बल दीड महिन्याच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर तूर खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश दिलेत. शासनाच्या या आदेशानंतर खाजगी बाजार पेठमध्ये तुरीचे बाजार भाव लक्षणीय वधारले आहेत.

5000 ते साडेपाच हजार रुपये प्रति क्‍विंटल दराने विकली जाणारी तूर आता तब्बल 6 हजार 400 रुपयांनी म्हणजे हमीभावापेक्षा शंभर रुपये अधिक दराने विकली जात आहे. तालुक्यातील कडा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी तुरीला सहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल एवढा विक्रमी बाजार भाव प्राप्त झाला. खाजगीत हमी भावापेक्षा अधिक दर प्राप्त होत असल्याने तालुक्यातील तूर खरेदी केंद्र विराण पडल्याचे चित्र नजरेस पडत आहे. 

English Summary: Pigeon pea rate increased
Published on: 24 January 2022, 06:22 IST