News

विविध पिकांवर येणारे व्हायरस हे पिकाच्या पेशीत राहणारे सुक्ष्मजीव आहेत. जगातिल पहिला शेती क्षेत्रात येणारा व्हायरस हा मार्टिनस बेजिरिन्क या डच शास्रज्ञाने १८९८ मधे शोधुन काढला. तंबाखु पिकावरिल टोबॅको मोझॅक व्हायरस चा या शास्रज्ञाने शोध लावला होता, ज्यास ते त्यावेळेस द्रव स्वरुपातील जिवंत संसर्ग करणारे द्रव असा उल्लेख करत.

Updated on 07 March, 2023 11:50 AM IST

विविध पिकांवर येणारे व्हायरस हे पिकाच्या पेशीत राहणारे सुक्ष्मजीव आहेत. जगातिल पहिला शेती क्षेत्रात येणारा व्हायरस हा मार्टिनस बेजिरिन्क या डच शास्रज्ञाने १८९८ मधे शोधुन काढला. तंबाखु पिकावरिल टोबॅको मोझॅक व्हायरस चा या शास्रज्ञाने शोध लावला होता, ज्यास ते त्यावेळेस द्रव स्वरुपातील जिवंत संसर्ग करणारे द्रव असा उल्लेख करत.

पिकावरिल व्हायरस च्या कोअर मधे न्युक्लिक असिड असते. न्युक्लिक असिड हे एकतर रायबो न्यक्लिक असिड (RNA) किंवा डि ऑक्सिरायबो न्युक्लिक असिड (DNA) असते. सर्वच प्लांट व्हायरस हे रॉड किंवा आयसोमेट्रिक आकाराचे असतात. व्हायरसच्या कोअर च्या बाहेरिल बाजुस प्रोटिन्स (प्रथिने) चे कवच असते. पिकावरिल व्हायरस ला पिकामधे शिरण्यासाठी छिद्र लागते, त्याशिवाय ते पिकांस शीरु शकत नाहीत.

ह्या अशा जखमा पिकावर नैसर्गिक किंवा मानव निर्मित घटनांनी होत असतात. खालिल ठिकाणी पिकावर विविध नैसर्गिक आणि मानव निर्मित कारणांमुळे होणा-या जखमांची माहीती आहे, यापैकि एकही घटना घडत असेल तर ती पिकात व्हायरस शिरण्यास मदत करेल. त्यानुसार योग्य ती उपाययोजना करणे गरजेचे ठरते.

शेतकऱ्यांनो चारा साठवणुकीचे असे करा नियोजन

मुळांची वाढ होत असतांना, नविन मुळी फुटणे.
जोराचा वारा ज्यामुळे पिकाचे अवयव तुटतात अगर त्यांना इजा होते.
फवारणी करतांना फांदी, पान वै तुटणे.

रसशोषक किडिंचा प्रादुर्भाव
मुळांवरिल सुत्रकृमींचा प्रादुर्भाव
विविध प्रकारचे कलम करुन पिकांची लागवड करत असतांना.
पिकावर येणारे व्हायरस हे प्रामुख्याने निमॅटोड, रस शोषक किडी, बुरशी, पॅरासिटिक प्लांट याव्दारे पसरत असतात.

शेतकऱ्यांनो उत्पन्न वाढीचा आराखडा तयार करा

यापैकि किडिंमुळे आणि निमॅटोड मुळे शेती पिकांत जास्तीत जास्त प्रमाणात व्हायरस चा प्रसार होतो, यांना व्हेक्टर म्हणुन ओळखले जाते. हे व्हेक्टर जेव्हा पिकावर हल्ला करतात तेव्हा त्यांच्या शरिरात आधीपासुनच असलेला व्हायरस पिकात शिरतो, हि क्रिया अगदी १ ते ५ सेकंदात पुर्ण होते. त्यामुळे रसशोषक किड पिकांस दंश किंवा जखम करु शकणार नाही असे एखादे किटकनाशक फवारणे किंवा अशा किडिंना रोपांपासुन लांब ठेवणे गरजेचे असते.

रसशोषक किडिंसाठी वापरले जाणारे किटनाशक हे किडिवर प्रक्रिया करुन तिला मारण्यासाठी ३० मिनिट ते २ दिवस देखिल लागतात, त्यादरम्यान होणारे व्हायरस चे संक्रमण थांबवणे जड जाते. काही व्हायरस हे फुलांतील परागकण आणि बीयांमुधुन देखिल ट्रान्सिमिट (संक्रमित) होतात.

महत्वाच्या बातम्या;
मागणी येईल तिथं कांदा खरेदी करणार, शेतकऱ्यांना लवकरच मोठी मदत मिळणार, राज्य सरकारचा निर्णय
ज्वारीच्या भाकरीचे आहारातील महत्त्व; जाणून घ्या
शेतकऱ्यांनो काळजी घ्या! बहुतांशी जिल्ह्यांत पावसासह गारपिटीची शक्यता

English Summary: Picavril virus farmar
Published on: 07 March 2023, 11:50 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)