News

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीच्या पाडेगाव येथील ऊस संशोधन केंद्रामार्फत फुले 265 हा उसाचा वाण महाराष्ट्र मध्ये सन 2007 मध्ये आडसाली, पूर्वहंगामी आणि सुरू या तीनही हंगामासाठी शिफारस करण्यात आला.

Updated on 11 September, 2021 7:20 PM IST

 महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीच्या पाडेगाव येथील ऊस संशोधन केंद्रामार्फत फुले 265 हा उसाचा वाण महाराष्ट्र मध्ये सन 2007 मध्ये आडसाली, पूर्वहंगामी आणि सुरू या तीनही हंगामासाठी शिफारस करण्यात आला.

 तसेच 2009 मध्ये गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश,कर्नाटक आणि महाराष्ट्र या राज्यात अखिल भारतीय ऊस  संशोधन संस्था, लखन यांनी शिफारशीत केला.

 हा उसाचा वाण लागवडीस शासनाची परवानगी आहे व हा वाण ऊस लागवडीस व गाळपास योग्य असल्याचे प्रमाणित  झाली असून शेतकऱ्यांच्या फुले-265 या ऊस वाणाची नोंद कारखान्याने घ्यावी.

जेसाखर कारखाने फुले-265 या ऊस वाणाच्या लागवडीचे नोंद घेणार नाहीत, त्या कारखान्याचा गाळप परवानानाकारण्यात  येईल अशी भूमिका साखर आयुक्तांनी घेतली आहे. फुले 265 या वाहनाचा तीनही हंगामात साखरेचा उतारा हा सरासरी 14.40 टक्के आढळला आहे. हा वाण मध्यम ते उशिरा पक्व होणारा असून  थंडीचा कालावधी मिळाल्यावर डिसेंबर ते जानेवारी नंतर हा वाण तोडणीस योग्य असतो.

 

या वाणाची ठळक वैशिष्ट्ये

  • फुले-265 या वाणाच्या खोडव्याची व फुटव्यांची वाढ चांगली होते.
  • चाबुककानी, मर व लाल कुज सारख्या रोगांना प्रतिकारक आहे.
  • फुले 265 वाणाचे तोडणी जानेवारीनंतर करावी.
English Summary: phule 265 species of cane give permit for gaalap
Published on: 11 September 2021, 07:20 IST