News

गुलाबी बोंडअळी या पतंगवर्गीय किटकाची मादी एक विशिष्ट प्रकारचा गंध वातावरणात सोडते. त्यामुळे नर किटक मादीकडे आकर्षीत होतात. या यंत्रणेचा वापर करून बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी व शेतामधील बोंडअळीचा नर पतंग पकडण्यासाठी कामगंध सापळा फायद्याचा ठरतो. नर पतंग पकडल्या गेल्यास पुढील प्रजनन रोखण्यास मदत होते. बोंडअळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी व प्रादुर्भाव तात्काळ लक्षात घेण्यासाठी कामगंध सापळ्यांचा वापर प्रभावी व फायद्याचा ठरतो. या सापळ्यांचा वापर कपाशी लागवडीपासून ४५ दिवसांनी केल्यास किडीची संख्या लक्षात येते आणि किटकनाशकांचा योग्य वेळी तसेच योग्य प्रमाणात वापर करून ही किड नियंत्रणात येऊ शकते. यंदाच्या वर्षी गुलाबी बोंडअळीला अटकाव करण्यासाठी जिल्हा प्रशासनासह जिल्ह्याच्या कृषी विभागाने कंबर कसली आहे. असे असले तरी कृषी विभागाच्यावतीने आतापर्यंत केवळ २३ हजारच कामगंध सापळे वाटप करण्यात आल्याने यंदाही बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येणार असल्याचे बोलले जात आहे. शिवाय भविष्यात कामगंध सापळ्यांचा तुटवडा जिल्ह्यात निर्माण होणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Updated on 13 August, 2018 9:31 AM IST

संबंधित बातमी वाचण्यासाठी: मराठवाडातील शेंदरी बोंडअळीच्‍या व्‍यवस्‍थापनासाठी सरसावले कृषीचे विद्यार्थी

गत वर्षी कपाशी पिकावर गुलाबी बोंडअळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला होता. असे असले तरी यंदाच्या वर्षी वर्धा जिल्ह्यातील २ लाख २९ हजार ५ हेक्टरवर कपाशीची लागवड झाली आहे. बोंडअळीला अटकाव करण्यासाठी एक एकरात कमीत कमी तीन कामगंध सापळे लावणे क्रमप्राप्त आहे. २.२९ लाख हेक्टर वरील कपाशी पिकाच्या संरक्षणासाठी सुमारे १७ लाख १७ हजार ५३७ कामगंध सापळ्यांची गरज भासणार आहे. कृषी विभागाने आतापर्यंत २३ हजार कामगंध सापळे वाटप केले असले तरी भविष्यात कामगंध सापळ्यांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता तज्ञांकडून वर्तविला जात आहे.

English Summary: Pheromone Traps Situation in Vidarbha Region
Published on: 10 August 2018, 10:09 IST