मुंबई- सध्या देशात सर्वत्र पेट्रोलने (Petrol) शंभरी पार केली आहे. राज्यातही पेट्रोलचे दर 110 रुपये प्रति लिटर च्या आसपास असल्याचे बघायला मिळत आहे. मात्र आगामी काही दिवसात पेट्रोलचे दर अजून वाढण्याचे संकेत मिळत आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार, सौदी अरेबियाने (Saudi Arabia) कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ केली आहे त्यामुळे याचा परिणाम म्हणुन भारतासमवेतच आशियातील प्रमुख देशांत पेट्रोल डिझेलच्या किमतीत कमालीची वाढ होऊ शकते. आशिया (Asia) खंडासमवेतच युरोप (Europe) आणि अमेरिकन देशांमध्ये (In American countries) देखील कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्याने इंधन दरवाढीचा फटका सहन करावा लागणार आहे.
सौदी अरेबियाच्या या दरवाढीमुळे देशातील सर्वसामान्य जनतेच्या खिशाला आगामी काही दिवसात रात्री बसणार असल्याचे सांगितले जात आहे. सौदी अरेबिया स्थित कंपनी "सौदी आरामको" या कंपनीने पुढच्या महिन्यापासून कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. फ्लॅगशीप ग्रेड 60 सेंट प्रति बॅरलने वाढवण्याचा निर्णय या सदर कंपनीने घेतल्याचे सांगितले जात आहे. सौदी अरेबियाने या कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ आशिया अमेरिका आणि युरोपीयन देशासाठी केल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे कच्चे तेल 95 ते 100 डॉलरच्या घरात जाणार असल्याचे सांगितले जात आहे मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की 2014 नंतर एवढी घसघशीत वाढ पहिल्यांदाच करण्यात आली आहे.
सौदी अरेबियाच्या या कच्च्या तेलाच्या किमती वाढवण्याचा निर्णयामुळे जगभरात इंधन वाढीचा भडका उठणार असल्याचे सांगितले जात आहे. सौदीच्या निर्णयासमवेतच रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशात वाढणारा वाद देखील इंधन दरवाढीसाठी कारण ठरू शकतो असे तज्ञांनी मत व्यक्त केले आहे. देशात सध्या पेट्रोल-डिझेलच्या किमती मुळे मध्यमवर्गीय कुटुंबांची आर्थिक कोंडी बघायला मिळत आहे. आगामी काही दिवसात पाच राज्यांमध्ये निवडणुका असल्याकारणाने डिसेंबर 2021 पासून देशात इंधन दरवाढ केली गेली नसल्याचे समजत आहे.
मात्र आता कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली असून या राज्यातील इलेक्शन पार पडल्यानंतर केंद्र सरकार पुन्हा एकदा इंधन दरवाढ करण्याच्या विचारात असल्याचे समजत आहे. पाच राज्यातील निवडणुका आटोपल्यानंतर पुन्हा एकदा देशात इंधन दरवाढीचा भडका हा ठरलेलाच असल्याचे असे मत तज्ज्ञांद्वारे व्यक्त केले जातं आहे.
Published on: 06 February 2022, 09:16 IST