News

देशात सर्वत्र इंधन दरवाढीचा (Fuel price hike) भडका उडाला आहे, मात्र नोव्हेंबर महिन्यापासून इंधनाचे दर मोठे स्थिर आहेत. दरम्यान रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे कच्चा तेलाच्या दरात मोठी वाढ झाली आहे, परंतु असे असले तरी अद्याप भारतात इंधन दरवाढ झालेली नाही.

Updated on 05 March, 2022 11:21 AM IST

देशात सर्वत्र इंधन दरवाढीचा (Fuel price hike) भडका उडाला आहे, मात्र नोव्हेंबर महिन्यापासून इंधनाचे दर मोठे स्थिर आहेत. दरम्यान रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे कच्चा तेलाच्या दरात मोठी वाढ झाली आहे, परंतु असे असले तरी अद्याप भारतात इंधन दरवाढ झालेली नाही.

तज्ञांच्या मते, कच्च्या तेलात वाढ झाली की इंधनचा दर वाढतो. मात्र, देशात पाच राज्यांमध्ये निवडणुका (Elections in five states) असल्याने इंधनाचा दर वाढवण्यात आलेला नाही. पाच राज्यातील विधानसभा निवडणूका उरकताच इंधन दरवाढीचा भारतीय जनतेला सामना करावा लागणार आहे. यामुळे मध्यमवर्गीय लोकांच्या खिशाला कात्री बसणार असल्याचे सांगितले जात आहे. आगामी दोन दिवसांत या पाच राज्यातील निवडणुकांचे मतदान संपुष्टात येणार असून त्यानंतर इंधनाचे दर (Petrol Diesel Price Hike) वाढतील असे भाकीत सांगितले जात आहे. पाच राज्यांतील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत केंद्र सरकारने इंधनाच्या दरात वाढ केलेली नसल्याचे बघायला मिळत आहे परंतु या राज्यातील विधानसभा निवडणुका संपताच इंधनाचे दर वाढतील असे तज्ज्ञांद्वारे सांगितले जात आहे.

नोव्हेंबर महिन्यापासून कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होऊन देखील देशात पेट्रोल डिझेलचे दर स्थिर आहेत याचे एकमेव कारण पाच राज्यातील विधानसभा निवडणुका असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे आगामी काही दिवसात निवडणुकांचा रिझल्ट लागल्यानंतर इंधनाचे दर वाढतील अशी चर्चा रंगली आहे. जागतिक बाजारात क्रूड ऑइल प्रती बॅरल 118 डॉलर एवढे झाले आहे, अमेरिकाने राखीव तेलातून कच्च्या तेलाचा वापर करण्याचे निर्देश दिल्यानंतर देखील कच्च्या तेलाच्या किमती आकाशाला गवसणी घालत आहेत.

राज्यात सर्वत्र पेट्रोलच्या दराने केव्हाच शंभरी पार केली आहे, डिझेलचे दर देखील शंभराच्या घरात येऊन ठेपले आहेत. त्यामुळे आगामी काही दिवसात डिझेलचे दर शंभरी पार करतील व पेट्रोलचे दर 100 हून अधिक होतील अशी आशंका वर्तवली जात आहे.

English Summary: petrol diesel rate will increase in march because of this
Published on: 05 March 2022, 11:21 IST