News

देशातील सामान्य नागरिक महागाईमुळे हतबल झाला आहे, पेट्रोल-डिझेलच्या किमतीने तर मध्यमवर्गीयांचे पुरते कंबरडेच मोडले आहे. राज्यात सर्वत्र पेट्रोल व डिझेलने शंभरी पार केले असून यामुळे गरीब जनतेला मोठ्या संकटांना सामोरे जावे लागत आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, अजून पेट्रोल डिझेलच्या किमतीत कमालीची वाढ होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती या दिवसेंदिवस वाढत असल्याचे सांगितले जात आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीमुळे भविष्यात भारतात पेट्रोल अजून कडाडेल असे सांगितले जातं आहे.

Updated on 18 January, 2022 5:13 PM IST

मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या कच्च्या तेलाचा भाव 87 डॉलर प्रति बॅरल एवढा आहे. हा भाव गेल्या सात वर्षातील सर्वाधिक असल्याचे नोंदवल गेल आहे. जाणकारांच्या मते, 2014 मध्ये देखील कच्च्या तेलाच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ नोंदवण्यात आली होती याचा परिणाम हा स्थानिक बाजारात पेट्रोल डिझेलच्या किमतीत प्रकर्षाने जाणवला होता. आता देखील सलग पाच आठवड्यापासून कच्च्या तेलाच्या किमतीत लक्षणीय वाढ बघायला मिळत असल्याचे तज्ञ सांगत आहेत. त्यामुळे  भारतात आगामी काही दिवसात पेट्रोल डिझेलच्या किमतीत आग लागण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

जानकार लोकांच्या मते, जगभरात कोरोनाव्हायरस आटोक्यात आल्याचे चित्र समोर येत आहे, त्यामुळे ठप्प पडलेले उद्योग धंदे परत एकदा मोठ्या जोमाने सुरू होत आहेत. उद्योगधंदे परत एकदा पटरीवर आले असल्याने इंधनाची खपत की लक्षणीय वाढली आहे, त्यामुळे मागणी आणि पुरवठा यामध्ये फार मोठी तफावत आहे आणि ह्याच कारणाने कच्च्या तेलाचे दर हे गगन भरारी घेत आहेत. एकंदरीत तयार झालेल्या परिस्थितीमुळे भारत सरकारला पेट्रोल-डिझेलच्या किमती वर लगाम लावायला खूपच जिकरीचे होणार आहे, त्यामुळे भविष्यात पेट्रोल डिझेलचे दर अजून वाढण्याची शक्यता असल्याचे भाकीत तज्ञ व्यक्त करत आहेत.

मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, मागच्या वर्षी  डिसेंबर महिन्यात म्हणजे डिसेंबर 2021 मध्ये कच्च्या तेलाचे भाव 69 डॉलर प्रती बॅरल एवढे होते जे की आत्ता 87 डॉलर प्रति बॅरल एवढे झाले आहेत म्हणजे कच्च्या तेलाच्या किमतीत सुमारे 25 टक्क्यांनी घसघशीत वाढ नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे याचा सरळ परिणाम भारतात देखील पेट्रोल-डिझेलच्या किमती वर होणार असल्याचे सांगितले जात आहे. म्हणजे एकंदरीत तयार झालेल्या समीकरणामुळे मध्यमवर्गीयांचे महागाई परत एकदा कंबरडे मोडण्यास सज्ज होताना दिसत आहे.

English Summary: petrol diesel prices will be rose again
Published on: 18 January 2022, 05:13 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)