पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या दरामुळे सगळे वैतागलेले असताना या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनेदेशातील जनतेला मोठा दिलासा दिला आहे.
पेट्रोल व डिझेलवरील उत्पादन शुल्कात 8 रुपये व डिझेल वरील उत्पादन शुल्कात 6 रुपयांची कपात केली. त्यामुळे पेट्रोल प्रति लिटर 9.50 रुपये तर डिझेल सात रुपयाने स्वस्त झाले असून हे दर आज मध्यरात्रीपासून लागू करण्यात येणार आहे. या करकपात याची माहितीकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिली.आता या नवीन करारानुसार दिल्लीमध्ये एक लिटर पेट्रोल 105.41 रुपया ऐवजी आता 95.91 रुपयांना मिळेल तर डिझेल 96.67 रुपया ऐवजी आता 89.67 रुपयांना मिळेल.
इतका कमी झाला व्हॅट
चालू परिस्थितीत सरकार पेट्रोलवर 27.90 व डिझेलवर 21.80 रुपयांचे उत्पादन शुल्क वसूल करते. आता या कपाती नंतर पेट्रोल वर 19.90 व डिझेलवर 15.80 त्यांचे उत्पादन शुल्क राहील यामुळे संपूर्ण देशात पेट्रोल साडेनऊ तर डिझेल सात रुपये प्रति लिटर ने स्वस्त होईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच राज्यांना महागाईने होरपळणाऱ्या जनतेला दिलासा देण्यासाठी उत्पादन शुल्कात कपात करण्याचा सल्ला दिला होता. पण त्याला महाराष्ट्रासह अन्य कोणत्याही राज्याने सकारात्मक प्रतिसाद दिला नव्हता. त्यामुळे आता स्वतः केंद्राने ज्या करकपात द्वारे जनतेला दिलासा दिला आहे.
उज्वला योजनेच्या सिलेंडर वर दोनशे रुपये सबसिडी गॅस सिलेंडर मिळणार
केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की सरकारने उज्वला योजनेतील गॅस सिलेंडर वर या वर्षी दोनशे रुपयांची सबसिडी देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत एका कुटुंबाला वर्षाकाठी बारा सिलिंडर मिळतील व याचा फायदा देशातील नऊ कोटी कुटुंबांना मिळेल. तसं यासोबत प्लास्टिक उत्पादनांच्या कच्च्या मालावरील उत्पादन शुल्क ही कमी करण्यात येईल.
ज्या ठिकाणी आयातीवर आपले अवलंबित्व जास्त आहे. तसेच काही स्टील उत्पादनांच्या कच्चा मालावरील आयात शुल्क कमी केले जाईल.
महत्वाच्या बातम्या
नक्की वाचा:बचत गटातील महिलांनी करून दाखवले! शेतकरी महिला गटाचा तांदूळ, आंबा महोत्सवास मोठा प्रतिसाद
नक्की वाचा:आता एलआयसीने फसवले! पाच मोठ्या कंपन्यांमधूनही पडली बाहेर, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले
Published on: 21 May 2022, 09:29 IST