News

सध्या पेट्रोल आणि डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत. पेट्रोल आणि डिझेलचे भाव सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. सध्या केंद्र सरकारने दिवाळीच्या निमित्ताने पेट्रोल आणि डिझेलच्या भावामध्ये काही प्रमाणात दिलासा दिला असला तरी तो परवडणारा नाही.

Updated on 06 November, 2021 9:04 PM IST

 सध्या पेट्रोल आणि डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत. पेट्रोल आणि डिझेलचे भाव सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. सध्या केंद्र सरकारने दिवाळीच्या निमित्ताने पेट्रोल आणि डिझेलच्या भावामध्ये काही प्रमाणात दिलासा दिला असला तरी तो परवडणारा नाही.

 परंतु याला पर्याय म्हणून बिहार राज्यातील मुजफ्फरपुर जिल्ह्यात एक मशीन बनवण्यात आली आहे.या मशिनच्या साह्याने प्लास्टिक पासून पेट्रोल आणि डिझेल निर्मिती करण्यात येते.

 प्लास्टिक कचऱ्यापासून पेट्रोल आणि डिझेल तयार करण्याचा हा तंत्रज्ञान प्रकल्प बिहारमधील मुजफ्फरपुर जिल्ह्यात स्थापन करण्यात आला आहे. या प्रकल्पामध्ये तयार झालेल्या पेट्रोल आणि डिझेलची अनेकांनी पहिल्याच दिवशी खरेदी केली. बिहारचे महसूल आणि जमीन सुधारणा मंत्री राम सुरत राय यांनी या प्रकल्पाचे उद्घाटन केले.

या प्रकल्पाचे सीईओ आशुतोष मंगलम यांनी म्हटले की, या प्रकल्पात पेट्रोल आणि डिझेल तयार करण्यासाठी दररोज 200 किलो प्लास्टिक कचरा  वापरला जाईल. च्या माध्यमातून 130 लिटर पेट्रोल आणि दीडशे लिटर डिझेल तयार होईल. या प्रकल्पासाठी महापालिका प्लास्टिकचा कचरा सहा रुपये किलो दराने विकत घेणार असून य सहा रुपया मध्ये 70 रुपयाचे इंधन तयार होणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्लास्टिक कचऱ्यापासून हे इंधन तयार करण्यासाठी आठ तास लागतात.

 

 अशाप्रकारे बनते इंधन

 या प्रकल्पामध्ये इंधन तयार करताना प्लास्टिक कचऱ्याचे प्रथम ब्युटेन आणि नंतर ऑक्टेन मध्ये रुपांतर केले जाईल. त्यानंतर लागणारा दाब आणि तापमान वापरून आयसो ऑकटेन पासून पेट्रोल आणि डिझेल बनवले जाईल. या प्रकल्पामध्ये 400 सेल्सियस तापमानाचा वापर डिझेल साठी आणि आठशे अंश सेल्सिअस तापमानास वापर पेट्रोल तयार करण्यासाठी होतो. (संदर्भ- तरुण भारत नागपुर)

English Summary: petrol and diseal making by use of plasticc garbbage in bihar
Published on: 06 November 2021, 09:04 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)