आपल्या दोन वर्षांच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त वसईतील हौशी आई-बापाने चक्क त्याच्या आवडीच्या वेरना कारचा हूबेहूब केक बनवला. 221 किलो वजनाचा हा चॉकलेट केक वेरना कारच्या स्वरुपात बनवण्यात आला. केकच्या इंडस्ट्रीमध्ये प्रथमच ऐवढा मोठा केक बनवण्यात आला होता.
221 किलो वजनाचा केकने सर्वांचं लक्ष वेधलं होतं. केक इंडस्ट्रीमध्ये प्रथमच एवढा मोठा केक बनवला गेला होता. वसईच्या कामण येथील डोंगरी येथे राहणाऱ्या नवीन भोईर आणि शुभांगी भोईर या दाम्पत्याला लग्नाच्या सहा वर्षानंतर, 4 मार्च रोजी रेयांश हा गोड मुलगा झाला.
त्यात जवळपास एक महिना तो एनआयसीयूमध्ये उपचारार्थ दाखल होता. त्यामुळे त्याचा वाढदिवस दणक्यात साजरा करण्याचा विडाच भोईर दाम्पत्याने उचलला होता. वसईच्या कामण येथील डोंगरी येथे राहणाऱ्या नवीन भोईर आणि शुभांगी भोईर या दाम्पत्याला लग्नाच्या सहा वर्षानंतर, 4 मार्च रोजी रेयांश हा गोड मुलगा झाला.
एवढी मोठा केक बनवण्याचं आव्हान मॉन्जिनीज कंपनीने उचललं होतं. भिवंडीच्या मॉन्जिनीज केकच्या दुकानात ही ऑर्डर देण्यात आली होती. रेयांश हा आमच्यासाठी देवाचं गोड गिफ्ट आहे आणि त्यामुळेच त्याच्या प्रत्येक वाढदिवसाला काहीतरी वेगळं करण्याचा संकल्प करत असल्याची प्रतिक्रिया नवीन भोईर यांनी दिली.
ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह राज्यात अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
Published on: 06 March 2023, 12:29 IST