गेल्या काही दिवसांपासून राज्यात मिरचीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. सर्वात मोठी मिरची बाजार समिती आसलेल्या नंदुरबार बाजार समितीत मिरचीच्या भावात पुन्हा तेजी आली आहे. सध्या मिरची हंगाम शेवटच्या टप्प्यात आहे. आतापर्यंत बाजार समितीने एक लाख 65 क्विंटल मिरची खरेदीचा टप्पा पार केला आहे. लाल मिरचीने 16 हजार रुपयांच्या दराचा टप्पा पार केला आहे. यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होत आहे. काही दिवसांपासून याची आवक कमी झाली आहे.
बाजार समितीत लाल मिरचीची आवक कमी असल्याने तेजी कायम राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे पुढील काही दिवसात हे दर असेच राहण्याची शक्यता आहे. मिरचीची अद्याप तोड सुरू असून यावर्षी आणखी भाव वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नंदुरबार बाजार समितीच्या आवारात अनेक व्यापारी मिरचीची खरेदी करतात. सध्या ओल्या लाल मिरचीला 7 हजार रुपयांचा भाव मिळत आहे. तर कोरडी लाल मिरचीने 16 हजारांचा टप्पा पार केला आहे. बाजार समितीत अजून एक महिना हंगाम सुरू राहील.
तसेच यावर्षी बाजार समिती मिरची खरेदीचा दोन लाखांचा टप्पा पार करेल असा अंदाज आहे. यामुळे येणाऱ्या काळात याची लागवड वाढण्याची शक्यता आहे. या मिरचीची उशिरापर्यंत तोलाई सुरु असल्याचे दिसून आले. मिरची हंगाम तेजीत आल्याने शेतकरी शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. यामुळे मात्र विक्रीमध्ये दरात वाढ झाली आहे. तसेच मसाल्याचे पदार्थांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. बाजारात आता अनेकांना मिरची घेणे परवडत नाही.
आता पुढील वर्षी शेतकरी मिरचीची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्याची शक्यता आहे. कोरोना काळात याच्या भावात अनेक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. असे असताना आता भाव वाढल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. कोरोनामध्ये हॉटेललाईन पूर्णपणे ठप्प होती. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. आता सध्या हळूहळू परिस्थिती पूर्वरत होत चालली आहे. यामुळे शेतकऱ्यांना फायदा होत आहे.
Published on: 17 February 2022, 02:56 IST