संग्रामपूर जि. बुलढाणा येथे तहसील कार्यालयावर पूरग्रस्त शेतक-यांचा भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी संग्रामपूर, जळगाव जामोदसह परिसरातील तालुक्यामध्ये ढगफुटीमुळे आलेल्या पुरामुळे शेतक-यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून. परिसरातून शेकडो जनावरे पुरात वाहून गेले आहेत.
हजारो एकर शेतजमीन कातरली असून पिके वाहून गेल्याने शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे.शासनाने तातडीने पंचनामे करून जमीन खरडून गेलेल्या शेतक-यांना एकरी १ लाख व पिकासाठी एकरी ५० हजार रूपये नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली.यावेळी प्रकाश पोपळे, प्रशांत डिक्कर, पूजा मोरे, गजानन बंगाळे पाटील यांचेसह स्वाभिमानीचे पदाधिकारी व तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने ऊपस्थित होते.
यावेळी राजू शेट्टी म्हणाले, सरकार नेहमीच घाेषणा करते परंतु मदत कधीच मिळत नाही असा अनुभव आहे. त्यामुळे संकटात सापडलेल्या लाेकांना तातडीने मदत मिळावी यासाठी सरकारचे डाेकं ठिकाणावर आणायचे आहे. त्यासाठीच आजचा माेर्चा आहे असे बुलडाणा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (swabhimani shetkari sanghatana) नेते राजू शेट्टी यांनी माध्यमांशी बाेलताना नमूद केले. शेट्टी यांनी अतिवृष्टीग्रस्त भागात भेट दिली.
तेरणा इंजीनियरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मिळणार धेनू ॲपद्वारे डिजिटल उद्योमीता प्रशिक्षण...
सरकारने शेतकऱ्यांच्या (farmer) तोंडाला मदतीच्या नावावर पाने पुसली आहेत. सरकार कधीच मदत करत नसतं, सरकार फक्त मदतीची घोषणा करत असतं. त्यामुळे या अतिवृष्टीग्रस्त लोकांना तात्काळ मदत देण्यात यावी अन्यथा आम्ही सरकारच्या उरावर बसू असा इशारा त्यांनी दिला.
राज्यात पुन्हा वाढला लम्पीचा प्रादुर्भाव! शेतकऱ्यांनो काळजी घ्या..
पालकमंत्री किंवा लोकप्रतिनिधी यांना लोकांचं काही देणंघेणं नाही जनता मेली काय आणि राहिली काय यांना काही देणे घेणे नाही ते फक्त राजकारणात मश्गूल आहे दुसऱ्याचा पक्ष फोडण्यात मश्गूल आहेत अशी टीका शेट्टी (raju shetti) यांनी सत्ताधा-यांवर केली.
राज्यात पुन्हा वाढला लम्पीचा प्रादुर्भाव! शेतकऱ्यांनो काळजी घ्या..
पीकविमा भरून मिळवा कुट्टी मशिनचे बक्षीस, विठ्ठल जगताप यांचा पुढाकार...
Published on: 01 August 2023, 10:58 IST