शेती व्यवसायात गेल्या अनेक वर्षांपासून मोठा बदल पहायला मिळत आहे. शेतकरी बंधू पारंपरिक शेतीबरोबर अत्याधुनिक शेतीची कास धरत आहे. शिवाय काळानुसार पीकपद्धतीत बदल करीत आहेत. त्यातून त्यांना दर्जावान उत्पन्न मिळते. आपल्या देशात असे कितीतरी शेतकरी बंधू आहेत त्यांनी नाविन्यपूर्ण प्रयोग करून शेती व्यवसायात आपले एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे.
तरुण शेतकरी शेती व्यवसायात नवनवीन कल्पनांचा, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून यश संपादन करत आहेत. पारंपारिक शेती सोबत आधुनिक शेतीची कास धरत लाखो रुपये कमवण्याची किमया साधता आहेत. युवा पिढीचे शेती व्यवसायातील यश नक्कीच इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी असेल. अशीच एका तरुण शेतकऱ्याची यशोगाथा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
मध्यप्रदेशमधील शेतकऱ्याने शेतीत बदल करून शेती व्यवसायात स्वतःचे वेगळे असे स्थान निर्माण केले आहे. युवा शेतकरी आकाश चौरसिया हे मध्यप्रदेशच्या सागर येथे रहिवासी आहेत. एकेकाळी ते भाड्याच्या जमिनीवर शेती करत होते. मात्र या पठ्ठ्याने आज 16 एकर जमीन देखील खरेदी केली आहे.युवा शेतकरी आकाश चौरसिया यांनी काळाच्या ओघात पीक पद्धतीत बदल करत मिश्र पिकपद्धतीचा अवलंब केला आणि लाखों रुपये कमावण्याची किमया साधली.
एकेकाळी भाड्याच्या जमिनीवर शेती कसणाऱ्या या अवलियाने तिली गावात 16 एकर शेती घेतली आहे. गेली पाच वर्षे हा युवा शेतकरी एकाच वेळी 4 प्रकारची पिके घेत असून दरवर्षी 4 ते 5 लाख रुपये उत्पन्न कमवत आहेत. बहु-शेती अंतर्गत वर्षभर पीक घेतले जाते. लहान शेतकऱ्यांसाठी ही लागवड फायद्याची असल्याचे आकाश यांनी सांगितले. आकाश यांचे डॉक्टर बनायचे स्वप्न होते मात्र त्यांनी ते सोडून 10 दशांश जमीन भाड्याने घेऊन शेती करायला सुरुवात केली.
काय सांगता! जगातील सर्वात मोठ्या गवताची जगभरात चर्चा, लांबी इतकी मोठी की...
बहु-शेती पद्धतीने शेती केल्यामुळे कमी जागेतही चांगले उत्पन्न मिळू लागले. तसेच एकाच वेळी अनेक पिकांची लागवड केल्याने संसाधनांचा चांगल्या प्रकारे वापर करता आल्याचे त्यांनी सांगितले. फेब्रुवारीमध्ये आकाश आल्याची लागवड करतात. आणि याच महिन्यात आल्याच्या पिकावर राजगिरा लावतात. त्यानंतर दोन पिकांमध्ये काही अंतरावर पपईची रोपे लावतात. तसेच कुंद्रूचा वेल लावून ते बांबूच्या साहाय्याने शेताच्या मधोमध वर करतात. एक वेल जवळजवळ पाच ते दहा वर्षे उत्पादन देत असते. एकाच शेतात आले, राजगिरा, पपई व कुंद्रू यांची लागवड केली जाते.
आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी पोषक आहार महत्वाचा आहे. म्हणून त्यांनी आपले डॉक्टर बनण्याचे स्वप्न बाजूला ठेवून शेती करण्यास प्राधान्य दिले. त्यांनी बहुस्तरीय शेतीची पद्धत विकसित केली. त्यांच्या सेंद्रिय शेती आणि बहुस्तरीय शेतीच्या यशामुळे त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून प्रगत शेतकरी म्हणून गौरव देखील करण्यात आला आहे. एवढंच नाही तर त्यांना अनेक राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाले आहेत. युवा शेतकरी आकाश हे दुबईसह देशातील अनेक भागात बहुस्तरीय शेतीचे प्रशिक्षण देत आहेत.
महत्वाच्या बातम्या:
आगोदर ऊस पेटवला आता सोडतायेत गुरे; अतिरिक्त उसाचा राडा काही संपेना
मोदींकडून स्वनिधी योजनेची घोषणा; मिळणार 50 हजार रुपये
Published on: 11 June 2022, 03:26 IST