आयुर्वेदिक औषधांचे फायदा हे प्रत्येकांना माहिती आहे. सध्या कोरोना व्हायरस (corona virus) मुळे लोकांचा ओढा परत आयुर्वेदिक औषधांकडे वळत आहे, त्यात पंतप्रधान (Prime Minister) नरेंद्र मोदी यांनीही आवाहन करत आयुष मंत्रालयाच्या नियम पाळण्यास सांगितले आहे. आयुष मंत्रालयाच्या मतानुसार, आयुर्वेद कोरोनापासून वाचण्यासाठी एक सोपा आणि दमदार उपाय आहे. आयुर्वेदात असे काही घटक आहेत, ज्यातून रोग प्रतिकारक शक्ती (Immune system) वाढते. कोरोना (covid-19) आपल्या शरिरातील रोगप्रतिकारक शक्ती (Immune system) ला संपवत असतो.
यामुळे आपण जर आपली रोगप्रतिकारक शक्ती (Immune system) वाढवली तर कोरोनाशी दोन हात करण्यास आपण सक्षम असू. यामुळे आयुर्वेदाकडे लोकांच्या ओढा वाढला आहे. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या आयुर्वेदिक औषधांची विक्री वाढली आहे. नोएडा येथील केमिस्ट रितेश अग्रवाल म्हणाले की, कोरोनाच्या कारणामुळे लोक इम्युनिटी वाढवणारे औषध अधिक घेत आहेत. यात मध, गिलोय, विटामिन सी च्या गोळ्या, तुळशी, विटामीन, आयरनच्या गोळ्या आणि बाकी देशी औषधे घेत आहेत. विशेष म्हणजे हे औषध निरोगी व्यक्तीही घेऊन जात आहेत. यामुळे आयुर्वेदिक रोग प्रतिकारक शक्ती वाढवणारे औषध अधिक विकले जात आहेत, औषध घेणारे लोक मोदी सरकारला फॅलो करत असून आयुष मंत्रालयाचे नियम पाळत आहेत. मंत्रालयाकडून सांगण्यात आलेले औषधे लोक खरेदी करत आहेत. तुळशी ड्राप, त्रिकूट चूर्ण काढा, गिलोय गोळ्या आदी औषधांची विक्री अधिक होत आहे.
Published on: 20 April 2020, 10:47 IST