कोविड-१९ ला हरविण्यासाठी लोक वळले आयुर्वेदाकडे ; वाढली औषधांची विक्री

20 April 2020 10:39 AM


आयुर्वेदिक औषधांचे फायदा हे प्रत्येकांना माहिती आहे. सध्या कोरोना व्हायरस (corona virus) मुळे लोकांचा ओढा परत आयुर्वेदिक औषधांकडे वळत आहे,  त्यात पंतप्रधान (Prime Minister) नरेंद्र मोदी यांनीही आवाहन करत आयुष मंत्रालयाच्या नियम पाळण्यास सांगितले आहे. आयुष  मंत्रालयाच्या मतानुसार, आयुर्वेद कोरोनापासून वाचण्यासाठी एक सोपा आणि दमदार उपाय आहे. आयुर्वेदात असे काही घटक आहेत, ज्यातून रोग प्रतिकारक शक्ती (Immune system) वाढते.  कोरोना (covid-19)  आपल्या शरिरातील रोगप्रतिकारक शक्ती (Immune system) ला संपवत असतो. 

यामुळे आपण जर आपली रोगप्रतिकारक शक्ती (Immune system) वाढवली तर कोरोनाशी दोन हात करण्यास आपण सक्षम असू. यामुळे आयुर्वेदाकडे लोकांच्या ओढा वाढला आहे.  यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या आयुर्वेदिक औषधांची विक्री वाढली आहे.  नोएडा येथील केमिस्ट रितेश अग्रवाल म्हणाले की, कोरोनाच्या कारणामुळे लोक इम्युनिटी वाढवणारे औषध अधिक घेत आहेत. यात  मध, गिलोय, विटामिन सी च्या गोळ्या, तुळशी, विटामीन, आयरनच्या गोळ्या आणि बाकी देशी औषधे घेत आहेत. विशेष म्हणजे हे औषध निरोगी व्यक्तीही घेऊन जात आहेत. यामुळे आयुर्वेदिक रोग प्रतिकारक शक्ती वाढवणारे औषध अधिक विकले जात आहेत,  औषध घेणारे लोक मोदी सरकारला फॅलो करत असून आयुष मंत्रालयाचे नियम पाळत आहेत.  मंत्रालयाकडून सांगण्यात आलेले औषधे लोक खरेदी करत आहेत. तुळशी ड्राप, त्रिकूट चूर्ण काढा, गिलोय गोळ्या आदी औषधांची विक्री अधिक होत आहे.

Ayurveda to defect covid-19 medicine sale increased ayurveda medicine sale increased कोरोना व्हायरस कोविड-19 आयुर्वेदिक औषधांची विक्री वाढली आयुर्वेदिक औषध corona virus covid 19
English Summary: people turn to Ayurveda to defect covid-19 ; medicine sale increased

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.