1. बातम्या

लेमन ग्रासच्या शेतीकडे लोकांचा ओढा ; वाढू लागलंय उत्पादन

कसेल त्याला शेती उत्पन्न देते असे म्हटले जाते. या वाक्याची प्रचिती होते ती, म्हणजे लेमन ग्रासच्या शेतीने. शेती विचारपूरक आणि परंपरागत पद्धत सोडून जरा आधुनिक पद्धतीने शेती केली तर आपल्याला नक्कीच फायदा होईल, असं उदाहरण लेमन ग्रासचच्या शेती करणाऱ्यांनी मांडले आहे.

KJ Staff
KJ Staff


कसेल त्याला शेती उत्पन्न देते असे म्हटले जाते.  या वाक्याची प्रचिती होते ती म्हणजे लेमन ग्रासच्या शेतीने.  शेती विचारपूरक आणि परंपरागत पद्धत सोडून जरा आधुनिक पद्धतीने शेती केली तर आपल्याला नक्कीच फायदा होईल. असं उदाहरण लेमन ग्रासचच्या शेती करणाऱ्यांनी मांडले  आहे. शेती परवडत नाही असे म्हणणाऱ्यांना लेमन ग्रासने नवा मार्ग दाखवला आहे.  या शेतीतून अनेकजण भरघोस उत्पादन करत बकळ पैसा कमवत आहेत.  जर शेतीत निरनिराळे प्रयोग केले तर बेरोजगारी कमी होईल यात शंका नाही आणि शेतीकडे पाहण्याची नजर बदलेल.  लेमन ग्रास शेती ही एक व्यावसायिक शेतीच्या रुपाने उभरत आहे.  अनेक मोठं-मोठ्या कंपन्या याकडे आकर्षित होत आहेत.  विशेष म्हणजे फार कमी खर्चात ही शेती केली जाते.

उपायकारी लेमन ग्रास- लेमन ग्रास ही एक विशेष असे पीक आहे.  हा औषधी चहा असून आरोग्यासाठी हा चहा फार फायदेशीर आहे.  या चहाची मागणी शहरात अधिक आहे.  महाविद्यालयीन युवक -युवती असो किंवा कोणत्या आयटी कंपनीत काम करणार इंजिनियर सर्वांना दुधाच्या चहाऐवजी लेमन चहा अधिक प्रिय झाला आहे.  ही चहा आपल्या नेहमीच्या चहापेक्षा अधिक उपायकारक आहे.  या चहामुळे कोणताच त्रास होत नाही.  दुधाची चहा अधिक घेतल्याने अॅसिडीटीचा त्रास आपल्याला संभावतो.  परंतु लेमन टीमुळे कोणताच त्रास होत नाही.  जर आपल्याला खोकला किंवा सर्दी असेल तर त्यासाठी लेमन टी फायदेशीर आहे. 

यासह या लेमन ग्रासचा इतर कामांसाठीही उपयोग होतो. लेमन ग्रासच्या सुवासिक पानांमुळे त्याचे महत्त्व वाढते.  स्टीम डिस्टिलेशनद्वारे पानांमधून तेल मिळते.  जे सौंदर्यप्रसाधने, सौंदर्यप्रसाधने, साबण, कीटकनाशके आणि औषधांमध्ये वापरली जाते. अशा गुणकारी आणि बहुगुणी पिकासाठी विशेष मेहनत घ्यावी लागत नाही. या पिकाला न काही खाद्य लावता या रोपाची वृद्धी होत असते. यामुळे या पिकासाठी आपल्याला अधिक खर्च करण्याची गरज नसते.  लेमन ग्रास गरम आणि उष्णकटिबंधीय अशा दोन्ही वातावरणात वाढते.  या पीकाला अधिक पावसाची गरज पण भासत नाही. साधारण २५० ते ३०० मीमी इतका पाऊस जरा असला तरी लेमन ग्रासचं पीक उत्तम प्रकारे येते. जर पाऊस अधिक असला तर वृद्धी लवकर होते.


जमीन कशी असावी
 - सर्व प्रकारच्या जमिनीत याचे उत्पादन होत असते.  परंतु पाणी धरुन ठेवणारी माती या पिकासाठी अयोग्य आहे.  जिथे मातीची धूप जास्त होते,  तशा उतार असलेल्या भागात याची लागवड केल्यास मातीची धूप थांबते.  हे ६.५ पीएच.एच पर्यंत वाढू शकते.  हे पर्वताच्या उतार असलेल्या वांझ प्रदेशातही म्हणजे जेथे कोणती पीके घेता येत नाही तेथे हे पीक घेता येते.

खतांची गणित काय असावे - याचे पीक खत न घेता करता येते. परंतु अधिक नफा मिळविण्यासाठी ७५.३०.३० किलो पोटॅशची संपूर्ण मात्रा देणे आवश्यक आहे.  लागवडीपुर्वी शेताची तयारी करताना निम्मे प्रमाणात नायट्रोजन व संपूर्ण प्रमाणात स्फूर व पोटॅाश द्यावे.  उर्वरित नायट्रोजनचे अर्धे प्रमाण पहिल्या हंगामाच्या एक महिन्यापुर्वी आणि झाडाच्या वृद्धपकाळात दोनदा द्यावे.  आणि पिकाच्या दुसऱ्या कापणीनंतर द्यावे.

लागवड करण्याची वेळ - मॉन्सन सुरू झाला की, आपण याची लागवड करु शकता.  आता मॉन्सून सुरू होणार आहे. तर या पिकाच्या लागवडीसाठी जुलै महिन्याचा पहिला आठवडा अधिक चांगला असतो.
रोपांची कशी कराल लावणी - एका ओळीत म्हणजे वाफ्यांमध्ये साधरण ५० सेंटीमीटर ते ७५ सेंटीमीटरचे अंतर ठेवावे.  रोपांमध्ये साधरण ३० ते ४० सेंटीमीटरचे अंतर ठेवावे.
सिंचन - या पिकाला सिंचनची इतकी गरज नसते.  परंतु उत्पादन अधिक हवे असल्यास सिंचन करणे आवश्यक असते.  उन्हाळ्यात, १५ दिवसांच्या फरकाने सिंचन करावे. कापणी - तीन महिन्यानंतर कापणी करावी. त्यानंतर साधरण २ ते अडीच महिन्यात कापणी करावी.

English Summary: people interested in lemon grass farming, production has increased Published on: 20 April 2020, 06:36 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters