यंदाचा उन्हाळा दिवसेंदिवस वाढतच गेला. जे की एप्रिल महिना पूर्ण हा गर्मीमध्ये गेला. वाढत्या उन्हाने लोकांना हैराण करून सोडले. जे की मी महिन्यात देखील अजून ऊन वाढतेय की काय अशी भीती निर्माण झालेली होती. मात्र आता मे महिन्यात उन्हाळ्यापासून काही प्रमाणत सुटका भेटण्याची शक्यता वर्तवली आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये एप्रिल महिन्याच्या तापमानाची तुलना केली तर मे मध्ये त्या तुलनेत तापमान कमी राहील अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र यंदा पाऊस देखील सरासरी तुलनेपेक्षा जास्त असल्याचे सांगितले गेले आहे.
पुणे विभागाने दिली माहिती :-
मे महिन्यामध्ये बहुतांश प्रमाणत तापमानाचा पारा कमी येणार असल्याचे पुणे हवामान खात्याने सांगितले गेले आहे. एवढेच नाही तर पूर्वमोसमी पाऊस होता त्यापेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचे देखील हवामानशास्त्राने सांगितले आहे. देशातील उत्तर पश्चिम राज्यामध्ये तापमान तर वाढीवर राहिलेच मात्र सरासरीपेक्षा १०९.टक्के जास्त पाऊस राहणार असल्याचे सांगितले गेले आहे. जे की या अंदाजमुळे सर्वांची नजर ही मान्सून कडे लागलेली आहे.
गोवा आणि कर्नाटक मध्ये पडणार मुसळधार पाऊस :-
मे महिन्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील तापमान कमी राहणार आहे तसेच चालू महिन्यामध्ये एप्रिल मधील तापमानाच्या तुलनेत तापमान कमी राहणार असल्याचे सांगितले जात आहे. तर पूर्वमोसमी पावसामुळे उन्हाच्या झळांची तीव्रता कमी येणार असल्याचे सांगितले गेले आहे. मे महिन्यामध्ये गोवा आणि कर्नाटक राज्यामध्ये सरासरीपेक्षा तापमान कमी राहणार आहे तसेच सरासरी पेक्षा पाऊस अधिक पडणार असल्याचे सांगितले जात आहे. मे महिन्यामध्ये उन्हाची तीव्रता कमी राहणार असल्याचे पुणे विभागाने सांगितले आहे. जे की कर्नाटक आणि गोवा राज्यामध्ये यंदा अधिक प्रमाण पाऊस पडणार असल्याचे सांगितले गेले आहे.
अमरावतीमध्ये उष्माघाताने ३ लोकांचा मृत्यू :-
दिवसेंदिवस वाढत्या उन्हामुळे अमरावती जिल्ह्यातील ३ लोकांचे उष्माघातामुळे बळी गेले आहेत. यंदा अमरावती मध्ये अधिकचा उन्हाळा पडलेला आहे जे की लोक या उन्हात भाजून निघत आहेत. यंदा अमरावतीमध्ये तापमानाचा पारा ४६ अंशाच्या पुढे गेलेला आहे. या उच्च तापमानामुळे तिघांचे बळी गेले असल्याची घटना समोर आलेली आहे. सुभाष मोहनसिंह नेतात, जयसिंह चंदनलाल मडावी असे मृत्यू झालेल्या लोकांची नावे आहेत.
Published on: 02 May 2022, 06:41 IST