देशात सध्या रोजगाराचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर निर्माण झाला आहे. अनेक कर्मचारी कमी पगारावर देखील काम करत आहेत. असे असताना आता वेगवेगळ्या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी पुढे आली आहे, त्यामुळे येणाऱ्या होळीत 15 हजारपेक्षा जास्त पगार घेणारे जे कर्मचारी आहेत त्यांना याचा फायदा होणार आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील जे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी EPFO (Employees' Provident Fund Organization) ही संस्था सेवानिवृत्ती निधीशी संबंधित कार्यरत आहे. आणि हिच संस्था या कर्मचाऱ्यांसाठी नवीन पेन्शन योजना आणण्याचा विचार करत आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यामध्ये ज्यांचे मासिक वेतन 15,000 पेक्षा जास्त आहे ते कर्मचारी पेन्शन योजना 1995 (EPS-95) साठी पात्र असणार असल्याची माहिती आहे. यामुळे होळी आधीच हा निर्णय होण्याची शक्यता आहे. याबाबत वृत्त पीटीआयने दिले आहे. जे संघटित क्षेत्रातील कर्मचारी आहेत ते त्या सर्वांचा अनिवार्यपणे EPS-95 मध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. ज्या कर्मचाऱ्यांचे मूळ पगार (मूलभूत वेतन+महागाई भत्ता (DA)) हा नोकरीवर रुजू होताना 15 हजार रुपयांपेक्षा जास्त आहे. त्या सर्व कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. यामुळे अनेकांना याचा फायदा होणार आहे.
सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टी या संस्थेची 11 आणि 12 मार्च रोजी एक बैठक होणार आहे. या बैठकीत आर्थिक वर्षातील व्याज दराबाबत निर्णय घेतला जाणार आहे. ईपीएफओच्या सदस्यांच्या पगारातील हिस्स्यावर अधिक पेन्शनची मागणी करत आहे. या परिस्थितीत 15 हजार रुपयांपेक्षा जास्त मूळ पगार असलेल्यांसाठी नवीन पेन्शन योजना किंवा नवीन पेन्शन आणण्याचा प्रस्तावही पुढील महिन्यात होणाऱ्या EPFO च्या बैठकीत निर्णय घेण्याची शक्यता आहे. यामुळे आता या बैठकीत काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
असे असताना याआधीच्या झालेल्या बैठकीत सीबीटी या संस्थेने 2021 या आर्थिक वर्षासाठी ईपीएफ ठेवीवर 8.5 टक्के व्याज निश्चित केले होते. त्यामुळे होळी सणाच्या आधी होणाऱ्या बैठकीत कामगारांविषयी काय निर्णय घेण्यात येणार याकडे कामगार वर्गाचे लक्ष लागले आहे. दरम्यान १५ हजारांपेक्षा जास्त पगार असणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे. यामुळे त्यांना काही सुविधा मिळाव्यात अशी मागणी अनेक दिवसांपासून केली जात आहे.
Published on: 21 February 2022, 10:06 IST