News

शेतकऱ्यांकडे असलेले महावितरणचे थकीत वीज बिल ऊस बिलातून वसूल करण्याचा आदेश देण्यात आला आहे. पाच जिल्ह्यातील साखर कारखान्यांना याबाबतचा आदेश साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिला आहे.

Updated on 30 October, 2021 2:41 PM IST

 शेतकऱ्यांकडे असलेले महावितरणचे थकीत वीज बिल ऊस बिलातून वसूल करण्याचा आदेश देण्यात आला आहे. पाच जिल्ह्यातील साखर कारखान्यांना याबाबतचा आदेश साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिला आहे.

या वीज बिल वसुली संदर्भात सर्व साखर कारखान्यांना पत्र पाठविण्यात आले आहे.

 याबाबत महावितरणने मागणी केली होती की शेतकऱ्यांकडे असलेले थकीत वीजबिल हे साखर कारखान्यांमार्फत वसूल करण्यात यावे. त्या पार्श्वभूमीवर साखर आयुक्तांनी वीज बिलाची थकबाकी ऊसदरातून वसूल करण्याबाबत साखर कारखान्यांच्या संचालक यांची बैठक बोलावली होती.या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

या बैठकीत  सातारा,सांगली, कोल्हापूर,सोलापूर आणि पुणे या पाच जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे संचालका सोबत या बाबतीत चर्चा झाली. यावर साखर कारखान्यांच्या संचालकांनी या बाबत शेतकऱ्यांशी बोलून कळवतो असे उत्तर या बैठकीत दिले. याबाबत महावितरण कडून थकीत वीज बिल वसुली संदर्भात साखर आयुक्तांनी आदेश काढावा यासंबंधीची विनंती करण्यात आली होती.परंतु साखर कारखान्यांच्या संचालकांकडून कोणत्याही प्रकारचे आश्वासन देण्यात आलेले नाही.

 

 महावितरण कंपनी प्रचंड थकबाकीमुळे सध्या आर्थिक संकटात आहे. जर थकबाकीचा राज्यातील विचार केला तर सर्वाधिक थकबाकी ही कृषिपंप धारक शेतकऱ्यांकडे आहे. ही प्रचंड थकबाकी वसूल करण्याचे मोठे आव्हान महावितरण पुढेआहे. गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीत दहा एचपी आणि त्यावरील शेतीपंपाचे ग्राहक, पाच लाख रुपये थकबाकी आणि त्यावरील थकबाकी असणाऱ्या ग्राहकाच्याविरोधात विशेष मोहीम राबविण्याची सूचना देण्यात आली होती. (संदर्भ-एबीपी माझा)

English Summary: pending electric bill recover from cane paymement bill from suger factory
Published on: 30 October 2021, 02:41 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)