News

गॅस सिलिंडरच्या किमतीमध्ये बऱ्याच दिवसांपासून आहे सातत्याने वाढ होत आहे. ज्या गॅस सिलेंडर अनुदान होते असाच सिलेंडरची किंमत आत्तापर्यंत २२५ रुपये प्रति गॅस सिलिंडर वाढली आहे. जर दिल्लीचा विचार केला तर १४.२ वजनाचा एलपीजी सिलेंडरची किंमत ८१९ रुपये इतकी आहे.

Updated on 27 April, 2021 9:52 PM IST

गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये बऱ्याच दिवसांपासून आहे सातत्याने वाढ होत आहे.  ज्या गॅस सिलेंडर अनुदान होते असाच सिलेंडरची किंमत आत्तापर्यंत २२५ रुपये प्रति गॅस सिलिंडर वाढली आहे. जर दिल्लीचा विचार केला तर १४.२ वजनाचा एलपीजी सिलेंडरची किंमत ८१९ रुपये इतकी आहे.

 परंतु या संदर्भात पेटीएमने एक खास ऑफर आणली आहे. या ऑफरचा अनुषंगाने ८१९ रुपयांचा सिलेंडर केवळ 19 रुपयात घेता येऊ शकतो. म्हणजे जवळ-जवळ ८०० रुपये कॅशबॅक ऑफर आहे. देशाच्या ज्या भागांमध्ये एलपीजी सिलेंडर सबसिडी नंतर ८१९ रुपये आहे तेथे पेटीएमच्या खास कॅश बॅकचा फायदा घेत सिलेंडर १९ रुपयात खरेदी करता येऊ शकतो.

  या ऑफरचा फायदा कसा घ्याल

  • सगळ्यात अगोदर मोबाईलमध्ये पेटीएम नसेल तर ते प्लेस्टोरमधून अगोदर डाऊनलोड करावे.

  • त्यानंतर पेटीएमवर जाऊन शो मोर की ऑप्शनवर क्लिक करावे.

  • तिथे गेल्यानंतर तुम्हाला रिचार्ज अँड पे बिलचा पर्याय दिसेल.

  • तिथे गेल्यावर बुक सिलेंडर या पर्यायावर क्लिक करा.

  • भारत गॅस, एचपी किंवा इंडेन यापैकी तुमचा गेस वितरक निवडा.

  • हा वितरक निवडल्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर किंवा एलपीजी आयडी टाका.

  • त्यानंतर पेमेंट ऑप्शन दिसेल.

  • पेमेंट करण्यापूर्वी ऑफरवर फर्स्ट एलपीजी प्रोमो कोड टाका.

 

 

या ऑफरचा संबंधीचे नियम व अटी

 आठशे रुपयांचा हा कॅशबॅक पेटीएमच्या माध्यमातून जे ग्राहक पहिल्यांदाच एलपीजी गॅस सिलेंडर बुक करत आहेत त्यांनाच मिळेल. कॅशबॅकची ऑफर ३० एप्रिल २०२१ पर्यंतच आहे. गॅस सिलेंडर बुक केल्यानंतर 24 तासात ग्राहकाला कॅश बॅक चे स्क्रॅच कार्ड मिळेल. या स्क्रॅच कार्डच्या सात दिवसांच्या आत वापर करावा लागेल.

English Summary: Paytm Discount Offer - Rs. 819 Gas Cylinder for Only Rs 19
Published on: 27 April 2021, 09:52 IST