News

किसान क्रेडिट कार्ड द्वारे बँकेतून घेतलेल्या पीक कर्ज परत फेडण्याची तारीख जवळ आली आहे. कर्ज फेडण्याची अंतिम तारीख ३१ मार्च असून येत्या काही दिवसात कर्जाची रक्कम परत करावी लागणार आहे. याच्या अंतर्गत शेतकरी पीक कर्ज अधिक व्याज न देता फक्त ४ टक्के प्रति वर्षाच्या दरानेच आपण त्याची परतफेड करू शकणार आहेत.

Updated on 12 April, 2021 2:01 PM IST

किसान क्रेडिट कार्ड द्वारे बँकेतून घेतलेल्या पीक कर्ज परत फेडण्याची तारीख जवळ आली आहे.  कर्ज फेडण्याची अंतिम तारीख ३१ मार्च असून येत्या काही दिवसात कर्जाची रक्कम परत करावी लागणार आहे. याच्या अंतर्गत  शेतकरी पीक कर्ज  अधिक व्याज न देता फक्त ४ टक्के प्रति वर्षाच्या दरानेच आपण त्याची परतफेड करू शकणार आहेत. 

नाहीतर बँक आपल्याकडून तीन टक्के अधिक म्हणजेच ७ टक्के व्याजदराने कर्ज वसूल करतील. दरम्यान शेतकऱ्यांना कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी केंद्र सरकार अधिक लोकांपर्यंत केसीसी पोहचवण्याचं प्रयत्न करत आहे.

दरम्यान  मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि  राजस्थान मध्ये शून्य टक्के व्याजदराने शेतीसाठी कर्ज देण्याची घोषणा केली आहे; पण हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा आपण वेळेवर कर्जाची परतफेड करू किसान क्रेडिट कार्डच्या अंतर्गत शेतकऱ्यांना शेतीसाठी विना तारण १.६० लाख रुपयांचे कर्ज देण्याची तरतूद करण्यात आली आहे.  आधीही मर्यादा १ लाख रुपयांपर्यंत होती. सावकारांच्या कचाट्यातून शेतकऱ्यांची सुटका व्हावी यासाठी सरकार विना तारण कर्ज देत आहे. दरम्यान कार्ड बनविण्यासाठी लागणारे प्रोसेस चार्ज रद्द केला  आहे.

हेही वाचा  : PM KISAN :शेतकऱ्यांनो तुमच्या हक्काचे दोन हजार येतील 'या' तारखेला

मागील वर्षी देशावर कोरोनाचं संकट आलं होतं अर्थात हे संकट अजूनही आपल्या सर्वांच्या डोक्यावर आहे.  यादरम्यान सरकारने २०२० साली कोरोनामुळे देशात लॉकडाऊन लावले होते, यात  शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठी सवलत दिली होती. केसीसीचा पैसा जमा करण्याची मुदत सरकारने वाढवली होती. सुरुवातीला ही तारीख ३१ मार्च होती नंतर ती वाढवत ३१ मे करण्यात आली होती, त्यानंतर परत याची मुदत वाढविण्यात  आली होती.

English Summary: pay loan amount still 31 march , otherwise farmer can't get card's benefits
Published on: 20 March 2021, 04:22 IST