News

सातारा: शेत पंपाची थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. ज्या शेतकऱ्यांकडे शेत पंपाची थकबाकी आहे त्या शेतकऱ्यांना 50% थकबाकी भरून थकबाकी मुक्त करण्यासाठी शासनाने 31 मार्च पर्यंत मुदत दिली आहे.

Updated on 26 March, 2022 8:52 PM IST

सातारा: शेत पंपाची थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. ज्या शेतकऱ्यांकडे शेत पंपाची थकबाकी आहे त्या शेतकऱ्यांना 50% थकबाकी भरून थकबाकी मुक्त करण्यासाठी शासनाने 31 मार्च पर्यंत मुदत दिली आहे.

कृषी पंप विजतोडणी धोरण 2020 अन्वये मूळ थकबाकीतुन थकबाकी युक्त शेतकऱ्यांना तब्बल 66 टक्के सवलत देण्यात येत आहे.

हेही वाचा:-मराठवाड्याचा पाण्याचा तंटा मिटणार! कृष्णा खोऱ्याचे पाणी मराठवाड्याकडे वळणार- जयंत पाटिल

सातारा जिल्ह्यात या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी झाली आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 1,35,000 शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला असल्याची माहिती समोर येत आहे. यापैकी सुमारे 70 हजार शेतकऱ्यांनी सवलतीच्या दरात थकबाकीची रक्कम महावितरणाला देऊन थकबाकी मुक्त झाले आहेत.

हेही वाचा:-धक्कादायक! पेट्रोल-डिझेल तब्बल पंचवीस रुपयांनी वाढणार; काय आहे नेमकं कारण

शासनाने तूर्तास संपूर्ण राज्यात वीज तोडणी धोरण थांबवले आहे. मात्र हे कायमस्वरूपी नसून तीन महिन्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी थकबाकी भरली नसेल त्या शेतकऱ्यांचे पुन्हा एकदा कृषीपंपाचे वीज कनेक्शन तोडले जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात थकबाकी मुक्त होण्यासाठी या योजनेचा मोठ्या प्रमाणात सहारा होऊ शकतो. या योजनेचा जर शेतकऱ्यांना लाभ घ्यायचा असेल तर 31 मार्च पर्यंत शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात शेत पंपाची थकबाकी देणे अपरिहार्य आहे.

हेही वाचा:-मोठी बातमी! 31 मार्च अखेर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतील 400 कोटी रुपये, वाचा याविषयी

थकबाकीच्या रकमेत 50 टक्के सवलत प्राप्त करण्यासाठी 31 मार्च अगोदर या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. चालू वीजबिल व मागील थकबाकी बिलापैकी 50 टक्के रक्कम भरून शेतकऱ्यांना थकबाकी मुक्त होण्याची संधी उपलब्ध झाली आहे. सातारा जिल्ह्यातील जवळपास 70 हजार शेतकरी या सवलतीचा फायदा घेत थकबाकी मुक्त झाले आहेत. राज्यातील शेतकऱ्यांनी या योजनेचा फायदा उचलत लवकरात लवकर थकबाकी मुक्त व्हावे असे आवाहन देखील महावितरणकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा:-आनंदाची बातमी! ऑस्ट्रेलियन हवामान खात्यानुसार महाराष्ट्रात चारही महिने पडणार पाऊस

English Summary: Pay 50% of farm pump arrears and get rid of arrears; Golden opportunity for farmers till March 31
Published on: 26 March 2022, 08:52 IST