News

जगभरात कोरोना व्हायरसचा कहर सुरु आहे. कोरोनावर औषध मिळाल्याचा दावा आतापर्यंत अनेक देशांनी केला आहे. यातच योगगुरु बाबा रामदेव यांनी देखील कोरोनावर औषध निर्माण केल्याचा दावा करत आज आयुर्वेदिक औषध लॉन्च केले. एका पत्रकार परिषदेत योगगुरु रामदेव बाबा आणि आचार्य बालकृष्ण यांनी याबाबत घोषणा केली.

Updated on 23 June, 2020 11:06 PM IST

 

जगभरात कोरोना व्हायरसचा कहर सुरु आहे. कोरोनावर औषध मिळाल्याचा दावा आतापर्यंत अनेक देशांनी केला आहे. यातच योगगुरु बाबा रामदेव यांनी देखील कोरोनावर औषध निर्माण केल्याचा दावा बाबा रामदेव यांनी केला असून  आयुर्वेदिक औषध आज  लॉन्च केले. एका पत्रकार परिषदेत योगगुरु रामदेव बाबा आणि आचार्य बालकृष्ण यांनी याबाबत घोषणा केली. यावेळी औषधाच्या ट्रायलमध्ये सहभागी शास्त्रज्ञ, डॉक्टर, रिसर्चर उपस्थित होते. कोरोना व्हायरसवर मात करणाऱ्या आयुर्वेदिक औषधाचे नाव कोरोनिल असे आहे.

संपूर्ण सायंटिफिक डॉक्यूमेंटच्या आधारे श्वासारी वटी, कोरोनिल ही कोरोनावरील एविडेंस बेस  असलेले पहिले आयुर्वेदिक औषध आहे.   हा रिसर्च संयुक्तपणे पतंजली रिसर्च इंस्टीट्यूट (पीआरआय) हरिद्वार, नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायंस (NIMS), जयपूरने केला आहे.  या औषधाची निर्मिती दिव्य फार्मसी, हरिद्वार आणि पतंजली आयुर्वेद लिमिटेड, हरिद्वारकडून केली जात असल्याचे पंतजलीकडून सांगण्यात आले आहे.

आज पतंजली परिवारासाठी मोठा दिवस आहे. मानवतेच्या सेवेसाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न करत आहोत. ही आनंदाची बातमी सांगताना आम्हाला खूप आनंद होत आहे. पतंजलीच्या सर्व शास्त्रज्ञांचे,  NIMS यूनिवर्सिटीचे डॉक्टर बलवीर सिंह आणि सर्वांचे अभिनंदन. आयुर्वेद पुन्हा आपलं गतवैभव मिळवू शकेल, असा विश्वास आचार्य बालकृष्ण यांनी यावेळी व्यक्त केला. कोरोनाबाधितांच्या संख्येत जगात भारत चौथ्या स्थानी आहे. देशात गेल्या 24 तासात कोरोनाबाधितांच्या संख्येत 14 हजार 933 ने वाढ झाली आहे. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 4 लाख 40 हजार 215 वर पोहोचला आहे. त्यापैकी एकूण 2 लाख 48 हजार 190 रुग्ण बरे झाले आहेत. म्हणजे रुग्णांचा बरे होण्याचा रेट हा 56.37 टक्के इतका आहे. सध्या कोरोनाची लागण असलेले रुग्ण 1 लाख 78 हजार 014 रुग्ण आहेत.

English Summary: patanjali baba ramdev launches coronil medicine for covid -19 treatment
Published on: 23 June 2020, 07:33 IST