News

आज (दि.19) रोजी राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी पाशा पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कृषी विभागाने बुधवारी (दि.18) पटेल यांच्या नियुक्तीचा शासन निर्णय जारी केला. पाशा पटेल यांची स्व.गोपीनाथ मुंडे यांचे अत्यंत जुने सहकारी मित्र आणि शेतकरी नेते म्हणुन राज्यभरात ओळख आहे.

Updated on 19 October, 2023 11:47 AM IST

आज (दि.19) रोजी राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी पाशा पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कृषी विभागाने बुधवारी (दि.18) पटेल यांच्या नियुक्तीचा शासन निर्णय जारी केला. पाशा पटेल यांची स्व.गोपीनाथ मुंडे यांचे अत्यंत जुने सहकारी मित्र आणि शेतकरी नेते म्हणुन राज्यभरात ओळख आहे.

कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी पाशा पटेल यांची नियुक्ती दुसऱ्यांदा झाली असून २०१७ मध्येही ते कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष होते.शेतीविषयक अभ्यासू नेतृत्व व शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे उत्कृष्ट जाणकार म्हणून त्यांची ओळख आहे.

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी नुकतेच लातूर येथील भाषणात या नियुक्तीच्या माध्यमातून आपण पाशा पटेल यांना गुरुदक्षिणा दिल्याचे म्हटले आहे.राज्य कृषी मूल्य आयोगाच्या माध्यमातून पाशा पटेल पुन्हा एकदा आपल्या कार्याचा ठसा उमटवत शेतकऱ्यांच्या हितार्थ निर्णय घेतील, असा विश्वास धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे.

English Summary: Pasha Patel appointed as Chairman of State Agricultural Value Commission
Published on: 19 October 2023, 11:47 IST