News

परभणी, हिंगोलीतील काही भागात पावसाच्या हजेरीमुळे पिकांना दिलासा मिळाला आहे. अनेक मंडलांतील रखडलेल्या पेरण्यासाठी दमदार पावसाची गरज आहे. परभणी जिल्ह्यातील सर्व ५१ मंडलांत अत्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.

Updated on 01 September, 2023 6:31 PM IST

परभणी

राज्यात सर्वदूर मान्सून सक्रिय झाला आहे. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील ८२ मंडळात (दि.१८) रोजी हलका ते मध्यम पाऊस झाला आहे. परभणी, हिंगोलीतील काही भागात पावसाच्या हजेरीमुळे पिकांना दिलासा मिळाला आहे. 

हिंगोली जिल्ह्यातील सर्व ३० मंडलांत हलका पाऊस झाला. हिंगोली, कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ तालुक्यांतील काही मंडलांत पावसाचा जोर राहिला. 

दरम्यान, हवामान विभागाने रविवारी पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार मुंबई शहर, उपनगर, ठाणे जिल्ह्यांत सोमवारपासून पावसाचा जोर वाढला आहे. तसेच मुंबई शहर व उपनगरात जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत.

English Summary: Parbhani, presence of rain in Hingoli, relief to crops
Published on: 19 July 2023, 06:21 IST