News

बीड जिल्ह्यातल्या आर्वी गावच्या सुरेश काळे यांनी तीन लाख रुपये खर्च करून साडेतीन एकरावर पपईची लागवड केली. मात्र ऐन तोडणीच्या काळातच ही बाग आता तोडून टाकावी लागत आहे. यामुळे त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. याचे कारण म्हणजे पपईवरती व्हायरसने इतका अटॅक केलाय की बागाच्या बागा उद्ध्वस्त होऊ लागल्या आहेत.

Updated on 25 November, 2022 10:42 AM IST

बीड जिल्ह्यातल्या आर्वी गावच्या सुरेश काळे यांनी तीन लाख रुपये खर्च करून साडेतीन एकरावर पपईची लागवड केली. मात्र ऐन तोडणीच्या काळातच ही बाग आता तोडून टाकावी लागत आहे. यामुळे त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. याचे कारण म्हणजे पपईवरती व्हायरसने इतका अटॅक केलाय की बागाच्या बागा उद्ध्वस्त होऊ लागल्या आहेत.

बीड जिल्ह्यातल्या अनेक गावातील पापईच्या बागावरती या व्हायरसचा अटॅक झाला आणि त्यामुळे काढणीला आलेले पीक हातचे जाताना शेतकऱ्यांना पहावं लागत आहे. यामुळे यावरची लवकरच लक्ष देण्याची गरज आहे. यामुळे शेतकऱ्यांना एक रुपया देखील मिळत नाही. सध्या ज्या बागा तोडणीला आल्या आहेत, त्या भागांवर या व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे.

दरम्यान, अनेक शेतकऱ्यांनी यावर उपाययोजना केल्या मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. यामुळे आता पुन्हा पपईच्या बागांवर रोग पडल्याने शेतकरी सरकारकडून मदतीची अपेक्षा करत आहेत. या व्हायरसमुळे पपईच्या फळावर सुरुवातीला डाग पडतात आणि नंतर फळ सडून जातं. यामुळे शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागत नाही.

मशरूम गर्ल! नोकरी सोडून मशरूमची शेती, आता करोडोंची उलाढाल

त्यामुळे लाखो रुपये खर्च करून उभ्या केलेल्या या बागा स्वतः नष्ट कराव्या लागत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे कष्ट आणि पैसे वाया जात आहेत. शिरूर तालुक्यामध्ये सध्या या बुरशीजन्य व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रामेश्वर भोसले यांच्या तीन एकरावरील पपईच्या बागेत आता फळ गळायला सुरुवात झाली आहे.

चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा कहर! बीजिंग, झेंगझोऊमध्ये पुन्हा कडक लॉकडाऊन

अशा प्रकारे अनेक शेतकरी आहेत, ज्यांच्या शेतात अशाप्रकारे हा रोग आला असून यामध्ये त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. दरम्यान, फळबागातून जास्तीचे उत्पन्न मिळते म्हणून अनेक शेतकऱ्यांनी पपईच्या बागा लावल्या. मात्र परतीच्या पावसानं पपईवर अनेक रोग आले आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी लाखो रुपये गुंतवले असताना उत्पन्न काहीच मिळाले नाही.

महत्वाच्या बातम्या;
नाशिक येथील १५ व्या कृषीथॉनमध्ये बीकेटीने केले जागतिक दर्जाच्या कृषी उत्पादनांचे अनावरण
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना येणार अच्छे दिन! इथेनॉलमुळे कारखान्यांची परिस्थिती सुधारणार
ढसाढसा रडत शेतकऱ्यांनी थेट धरले अधिकाऱ्यांचे पाय, जाणून घ्या नेमकं काय घडलं...

English Summary: Papaya farmers in trouble, orchards destroyed by virus attack
Published on: 25 November 2022, 10:42 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)