News

कोरोनाच्या काळात केंद्र सरकारने सुरू केलेली पंतप्रधान गरीब कल्याण योजना अंतर्गत गरिबांना पाच किलो गहू आणि तांदूळ मोफत देण्याची घोषणा केली होती.हीयोजना गेल्या पंधरा महिन्यांपासून सुरू आहे.

Updated on 25 November, 2021 9:20 AM IST

कोरोनाच्या काळात केंद्र सरकारने सुरू केलेली पंतप्रधान गरीब कल्याण योजना अंतर्गत गरिबांना पाच किलो गहू आणि तांदूळ मोफत देण्याची घोषणा केली होती.ही योजना गेल्या पंधरा महिन्यांपासून सुरू आहे.

आता केंद्र सरकारने या योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. डिसेंबर 2021 पासून मार्च 2022 पर्यंत या योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे.तसेच आहे त्याच दरात अत्यावश्यक वस्तू मिळणार असल्याची घोषणा केंद्रीय  मंत्री अनुराग ठाकूर यांनी केले.त्यामुळे बऱ्याच कुटुंबांना दिलासा मिळणार आहे.

 म्हणजे अजून जवळजवळ चार महिने नागरिकांना गहू आणि तांदूळ हे मोफत दिले जाणार आहेत.मार्च 2022 पर्यंत आहे त्याच दरात या अत्यावश्यक वस्तू मिळणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केले आहे. यासंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय  कॅबिनेटची बैठक झाली. 

या बैठकीनंतर ही घोषणा करण्यात आली.रेशनवरील धान्य विकत देण्याच्या तयारीत सरकार होते मात्रकेंद्रीय  कॅबिनेटच्या झालेल्या बैठकीत वेगळ्याच प्रकारचा निर्णय घेण्यात आला आहे.पहिलाच निर्णय हा रेशन धान्य याबद्दल घेण्यात आला.

English Summary: pantpradhaan garib kalyaan yojana expand till march 2022
Published on: 25 November 2021, 09:20 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)