News

राधानगरी धरण ९० टक्के भरले असून, सध्या १४०० क्युसेक नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यातील ८३ बंधारे पाण्याखाली असून कोल्हापूर-गगनबावडा मार्गावरील मांडुकली व लोंघे येथे पाणी आल्यामुळे कोकणातील संपर्क तुटला आहे.

Updated on 01 September, 2023 5:08 PM IST

कोल्हापूर

पंचगंगा नदीच्या पाणी पातळीने ३९ फुटांची इशारा पातळी गाठली आहे. तसंच जिल्ह्यातील ८३ बंधारे पाण्‍याखाली गेले आहेत. नदीची धोका पातळीकडे वाटचाल सुरू असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. राधानगरी धरण ९० टक्के भरले असून, सध्या १४०० क्युसेक नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. 

जिल्ह्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून कधी मुसळधार, तर कधी अतिवृष्टी सुरूच आहे. ओढे, नाले, ओहोळ, कालवे आणि शेती पाण्याने ओसंडून वाहू लागली आहे. 

दरम्यान, कोल्हापुरातील संभाव्य पुराच्या पहिल्या टप्प्यात येणाऱ्या २८ गावातील शाळा उद्यापासून बंद असणार आहेत. निवासी उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे यांनी ही माहिती दिली.तसेच संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आलेलं आहे.

English Summary: Panchgange moves to alert level Reaching the danger level
Published on: 25 July 2023, 06:18 IST