News

सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय कांद्याला टक्कर देण्यासाठी पाकिस्तानी कांदा मार्केटमध्ये उपलब्ध झाला आहे. पाकिस्तानचा कांदा भारत एकांदा पेक्षा सात रुपये किलो दराने स्वस्त विकला जात आहे. त्यातच भर म्हणून लोक डाऊन मुळे बांगलादेश सीमा बंद करण्यात आल्याने आपल्याकडील कांदा बांगलादेशात जाण्याचे प्रमाण कमी झाले आहे.

Updated on 03 July, 2021 12:53 PM IST

 सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय कांद्याला टक्कर देण्यासाठी पाकिस्तानी कांदा मार्केटमध्ये उपलब्ध झाला आहे. पाकिस्तानचा कांदा भारत एकांदा पेक्षा सात रुपये किलो दराने स्वस्त विकला जात आहे. त्यातच भर म्हणून लोक डाऊन मुळे बांगलादेश सीमा बंद करण्यात आल्याने आपल्याकडील कांदा बांगलादेशात जाण्याचे प्रमाण कमी झाले आहे.

त्यामुळे आपल्याकडे कांद्याचे देशांतर्गत बाजारातील दर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या कोरूना च्या पार्श्वभूमीवर बांगलादेश, थायलँड, मलेशिया इत्यादी देशातील बाजारपेठेमध्ये कांद्याला फारशी मागणी नाही. जर दर वर्षाचा विचार केला तर भारतामधून 37 हजार कंटेनर आंतरराष्ट्रीय बाजारात निर्यात केले जातात. परंतु या वर्षी अवघे बारा हजार कंटेनर्स म्हणजे जवळपास 70 टक्क्यांनी हे प्रमाण घसरले आहे. त्यातच आंतरराष्ट्रीय बाजारात पाकिस्तानच्या खानदानी भारतीय कांद्याला स्पर्धा निर्माण केल्याने कांदा निर्यातदारांच्या  चिंतेत भर पडली आहे.

जर श्रीलंकेच्या मार्केटचा विचार केला तर भारतीय कांदा 450 डॉलर प्रति टन या दराने विकला जात आहे तर तेथेच पाकिस्तानी कांदा तीनशे दहा डॉलर्स प्रति टन दराने मिळत आहे. जर हे प्रमाण पाहिले तर सहाजिकच पाकिस्तानच्या कांद्याच्या तुलनेत भारतीय कांदा महाग असल्याने पाकिस्तानी कांद्याला झुकते माप मिळत आहे. जर आपण अरब राष्ट्रांचा विचार केला तर पाकिस्तानला राष्ट्रांमध्ये कांदा निर्यात करायचा खर्च म्हणजे चेहरा वाहतूक खर्च हा भारतीय कांद्यापेक्षा कमी असल्याने अरब राष्ट्रांमध्ये पाकिस्तानच्या कांद्याला पसंती मिळत आहे. देशांतर्गत मागणीच्या तुलनेत कांद्याचा पुरवठा कमी होत असल्याने बाजारभाव टिकून राहण्यास मदत होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून न जाता आपला कांदा हा टप्प्याटप्प्याने गरजेनुसार बाजार समितीमध्ये विक्री करावा.

पाकिस्तानच्या कांद्यामुळे भारतीय कांद्याच्या बाजारभावात सध्या तरी कोणत्याही प्रकारचा परिणाम होणार नसल्याने शेतकऱ्यांनी कांदा विक्रीची घाई करू नये असे या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगत आहेत. मागच्या वर्षी अचानक भारतातून बांगलादेशात होणारी कांदा निर्यात बंद केली होती. त्यामुळे आपण बांगलादेशाचा विश्वास गमावून बसलो होतो. त्यामुळे बांगलादेशने या वर्षी ग्लोबल टेंडर काढले आणि देशांकडून कांदा खरेदी सुरू केली. पाकिस्तानचा कांदा ही भारतीय कांद्या पेक्षा स्वस्त असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत याची मागणी वाढली आहे.

English Summary: pakistani onion compete to indian onion
Published on: 03 July 2021, 12:53 IST