महावितरणची थकबाकी असो कि शेतसारा थकबाकी शेतकऱ्यांकडे जास्त प्रमाणात आहे. जसे आता काही दिवसांपूर्वी महावितरण कडून थकबाकीदार शेतकर्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे
तसेच आता शेतसारा भरणे देखील एक अति महत्त्वाची बाब आहे. चालू आर्थिक वर्ष पूर्ण होण्याअगोदर शेतकऱ्यांना हा शेतसारा भरावा लागणार आहे.जर शेतकऱ्यांनी शेतसारा भरला नाही तर सातबारा उतार्यावर थेट महाराष्ट्र शासनाचे नाव लागू शकते. सध्या ही कारवाई नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात सुरू करण्यात आली असून निफाडच्या तहसीलदारांनी शेतकऱ्यांना शेतसारा रक्कम भरण्याचे आवाहन केले आहे.
शेतकऱ्यांनी शेतसारा भरावा म्हणून नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात वसुलीला सुरुवात करण्यात आली आहे.त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना महसूल विभागाकडून नोटीस देखील बजावण्यात आली आहे. मुळे मार्च महिना अखेर हा शेतसारा वेळेत भरणे गरजेचे आहे. नाहीतर सक्तीच्या वसुलीला सुरुवात केली जाणार आहे. बिनशेती सारा तसेच अनधिकृत बिनशेती दंड, लॉन्स, मोबाईल टावर, शेतसारा तसेच पंप यांच्याकडे महसुलाची रक्कम थकली असल्याने या थकबाकीदारांना वेळोवेळी नोटीस पाठवून देखील खातेदार यांच्याकडे दुर्लक्ष करत आहेत.
सध्या महसूल विभागाकडून नोटिसा बजावण्यात आले असून भविष्यात शेतकरी शेतसारा भरणार का की कारवाईला सामोरे जाणारहे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
Published on: 18 February 2022, 11:43 IST