News

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत असलेल्या मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव क्या केंद्राने कोएम.0265 व एम.एस.0602 या दोन उसाच्या वानांच्या संकरातून एम. एस. 13081( फुले 10001) हा उसाचा नवीन वाण विकसित केला आहे.

Updated on 25 August, 2021 10:25 AM IST

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत असलेल्या मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव क्या केंद्राने कोएम.0265 व एम.एस.0602 या दोन उसाच्या वानांच्या  संकरातून एम. एस. 13081( फुले 10001) हा उसाचा नवीन वाण विकसित केला आहे.

.हा उसाचा वाण 29 ते 31 मे 2017 रोजी परभणी येथे पार पडलेल्या 45 व्या संयुक्‍त कृषी संशोधन आणि विकास समितीच्या बैठकीत हा वाण सुरू आणि पूर्व हंगामलागवडीसाठी महाराष्ट्रात शिफारस केलेला आहे. पाडेगाव ऊस संशोधन केंद्राने विकसित करून प्रसारित केलेला हा पहिलाच उसाचा वाण आहे.

साखर उत्पादनाच्या बाबतीत या वानाचा विचार केला तर घेण्यात आलेल्य 34  चाचणी पैकी 19 चाचण्यांमध्ये एम. एस.13081हा वान पहिल्या तीन क्रमांकात आलेला आहे. यामध्ये सुक्रोज चे प्रमाण सरासरी 19.78 टक्के आढळून आले आहे. उसाच्या खोडव्यासाठी हा वाण उत्तम प्रतीचा आहे. या वाणापासून खोडव्याची ऊस उत्पादन जवळजवळ 101.48 मेट्रिक टन प्रतिहेक्‍टर मिळाले आहे. तसेच पूर्व हंगामाचा विचार केला तर या वाणापासून मिळणारे सरासरी ऊस आणि साखरेचे उत्पादन अनुक्रमे 151.09 मेट्रिक टन प्रति हेक्टर आणि 21.53 मेट्रिक टन प्रति हेक्‍टर मिळालेली आहे.

 या वाणाची वैशिष्ट्ये

  • उसाची जात मध्यम ते भारी जमिनीत तसेच क्षारपड जमिनीतही उत्तम प्रकारे येते.
  • या जातीच्या उसामध्ये फुटव्यांचे प्रमाण अधिक असल्याने खोडव्याचे उत्पादन जास्त मिळते.
  • या वाणाच्या उसाची पाने गर्द हिरवी,आकाराने रुंद व सरळ वाढणारी असतात. पानांच्या देठांवर कूस आढळून येत नाही व पाचट सहजपणे निघते.
  • हा वाण खोडकीड,कांडी कीड,शेंडे कीड तसेच लोकरी मावा या साठी उत्तम प्रतिकार क्षमता असलेले आहे. तसेच मरआणिलाल कूजरोगास मध्यम प्रतिकारक आहे.
  • हा वान पाण्याचा ताण सहन करू शकते.
  • गळीत हंगामात अधिक साखर उतारा देण्यासाठी हा वाण काकांच्या पसंतीस पडलेला आहे.
  • महाराष्ट्रात या वाहनांची पाच टक्के पेक्षा जास्त क्षेत्रावर लागवड केली जाते.
English Summary: padegaon sugercane reserch center create a species of cane
Published on: 25 August 2021, 10:25 IST