News

तंत्रज्ञान युक्त काम करण्यात चीन पूर्ण जगात ओळखला जातो. चीनने आता अंतराळात भाताचे बियाणे तयार केले आहे. चीनने अंतराळात उगवलेल्या या भाताला स्पेस राईस हे नाव दिले आहे आणि त्याच्या पहिल्या पिकाची कापणी सुद्धा करण्यात आली आहे.

Updated on 15 July, 2021 12:53 PM IST

 तंत्रज्ञान युक्त काम करण्यात चीन पूर्ण जगात ओळखला जातो. चीनने आता  अंतराळात भाताचे बियाणे तयार केले आहे. चीनने अंतराळात उगवलेल्या या भाताला स्पेस राईस हे नाव दिले आहे आणि त्याच्या पहिल्या पिकाची कापणी सुद्धा करण्यात आली आहे.

 चीनने स्पेस राईस च्या बियाण्याला मागच्या वर्षी चांद्रयान सोबत अंतराळात पाठवले होते. अंतराळ यानात द्वारेजवळजवळ 40 ग्रॅम वजनाचे 1500 भाताचे बियाणे पृथ्वीवर आणले आहेत व त्या बियाणाला दक्षिण चीन मधील कृषि विश्वविद्यालय परिसर च्या शेतामध्ये लागवड करण्यात आली आहे. ब्रम्हांड विकिरण आणि शून्य गुरुत्वाकर्षण  यांच्या संपर्कात राहिल्यावर सुद्धा या बियाण्याला परत पृथ्वीवर आणले गेले आहे.

 याचे वजन जवळ जवळ चाळीस ग्राम  आहे. स्पेस राईस च्या पहिल्या पिकाची कापणी ही ग्वाँगडोंग च्या दक्षिण चीन कृषी विश्वविद्यालय च्या अंतराळ प्रजनन अनुसंधान केंद्रात करण्यात आली. या स्पेस राईस च्या बियाण्याची लांबी  आता एक सेंटिमीटर पर्यंत झाली आहे. या अनुसंधान केंद्राचे उपनिदेशक गुओ ताओ यांनी म्हटले की यामधील सगळ्यात चांगले बियाणे हे प्रयोग शाळेमध्ये तयार केले जाईल आणि नंतर शब्दांमध्ये त्याची लागवड केली जाईल.

 नेमके काय असते स्पेस राईस?

 अंतराळ मधील वातावरणामध्ये काही काळ राहिल्यानंतर या बियाण्यात काही परिवर्तन होते. अंतराळ मधून या बियाण्याला पृथ्वीवर आणल्यानंतर त्याची लागवड केली तर अधिक उत्पन्न मिळते. चीन 1987 पासून  तांदूळ आणि अन्य पिकांचे बियाणे अंतराळात घेऊन जात आहे. त्याचे उत्पन्न  सामान्य भात पिकापेक्षा जास्त होते. ब्लूमबर्ग च्या रिपोर्ट नुसार चीनने आतापर्यंत जवळजवळ 200 पेक्षा जास्त पिकांसोबत हा प्रयोग केला आहे.

ज्यामध्ये कापूस ते टोमॅटो या पिकांचा सुद्धा समावेश आहे. चिनी मीडिया च्या एका रिपोर्टनुसार, 2018 मध्ये चीनने 2.4 मिलियन हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रात अंतराळातून आणलेल्या बियाण्याचा वापर केला होता. चायनीज सोशल मीडिया युजर्स याला स्वर्ग का चावल असे म्हणतात.

 चीन अंतराळात पिके उगवण्यासाठी एक ग्रींनहाऊस चा वापर करण्याचा विचार करत आहे तसेच चीन चंद्रावर एक अनुसंधान केंद्र स्थापन करण्याचा विचार करीत आहे. चीनने तेरा शोध संस्थान ना सतरा ग्राम चंद्रावरची माती दिली आहे. ज्यामध्ये चिनी विज्ञान अकादमी, चीन भूविज्ञान विश्वविद्यालय आणि सन यात सेन विश्व विद्यालय यांचा समावेश आहे.

 माहिती स्त्रोत - अमर उजाला

English Summary: paddy plant cultivate in space china research
Published on: 15 July 2021, 12:53 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)