News

नाशिक जिल्ह्यात कांदा हे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. तसेच महाराष्ट्राच्या बऱ्याच भागांमध्ये सुद्धा कांदा लागवड ही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कांदा पिकावर होणारा सर्वाधिक खर्च हा निंदनी वर होतो.

Updated on 24 September, 2021 10:09 AM IST

नाशिक जिल्ह्यात कांदा हे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. तसेच महाराष्ट्राच्या बऱ्याच भागांमध्ये सुद्धा कांदा लागवड ही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कांदा पिकावर होणारा सर्वाधिक खर्च हा निंदनी वर होतो.

कांदा पिकातील तण काढणे फार जिकिरीचे काम असतं.सद्यपरिस्थिती पाहता मजुरांची टंचाई ही शेतकऱ्यां समोरील सगळ्यात मोठी समस्या आहे. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची गरज ओळखून नामांकित कृषी कंपनी इंसेक्टिसाईड इंडिया लिमिटेड ने ऑक्सिम तणनाशक  बाजारात आणले आहे. त्याबद्दल या लेखात माहिती घेऊ.

ऑक्सीम तणनाशक कधी वापरायचे?

 कांदा पिकाची लागवड केल्यानंतर 15 ते 20 दिवसांनी ऑक्सिमतणनाशक वापरले तरी चालते किंवा लागवडीनंतर दोन ते तीन पाणी दिल्यानंतर तणांचा  अंदाज घेऊन यातणनाशकाची फवारणी करू शकता. कांदा पिकातील खुरपणी करण्याला फार मोठा खर्च येतो आणि वेळही फार जातो. तसेच शेतकऱ्यांना हे तण काढण्यासाठी फार मेहनत घ्यावी लागते.

सगळ्या प्रकारचा शेतकऱ्यांना होणारा त्रास वाचवण्यासाठी  इंसेक्टिसाईड इंडिया लिमिटेडने ऑक्सिमतन नाशक बाजारात आणले आहे. या तणनाशकांची विक्री कंपनीच्या लोकप्रिय ट्रॅक्टर ब्रँड अंतर्गत केली जाणार आहे. हे तणनाशक संकुचित आणि रुंद पानांच्या तणांवर प्रभावीपणे नियंत्रण करेल असे सांगितले आहे.

English Summary: oxim weed insecticide in market for onion weed control
Published on: 24 September 2021, 10:09 IST