News

नवी दिल्ली: कोविड-19 संदर्भात, परदेशातून साधनांचा पुरवठा सुरु झाला असून, चीनने देणगी म्हणून दिलेली 1.70 लाख पीपीई (वैद्यकीय कर्मचाऱ्यासाठीचे वैयक्तीक संरक्षण साधन संच) भारतात आली आहेत. देशातल्या 20,000 पीपीई सह एकूण 1.90 लाख पीपीई आता रुग्णालयांना वितरीत करण्यात येतील, देशात सध्या उपलब्ध असलेल्या 3,87,473 पीपीईमधे याची भर पडणार आहे. केंद्र सरकारने 2.94 लाख पीपीई आतापर्यंत पुरवली आहेत.

Updated on 08 April, 2020 10:06 AM IST


नवी दिल्ली: 
कोविड-19 संदर्भात, परदेशातून साधनांचा पुरवठा सुरु झाला असून, चीनने देणगी म्हणून दिलेली 1.70 लाख पीपीई (वैद्यकीय कर्मचाऱ्यासाठीचे वैयक्तीक संरक्षण साधन संच) भारतात आली आहेत. देशातल्या 20,000 पीपीई सह एकूण 1.90 लाख पीपीई आता रुग्णालयांना वितरीत करण्यात येतील, देशात सध्या उपलब्ध असलेल्या 3,87,473 पीपीईमधे याची भर पडणार आहे. केंद्र सरकारने 2.94 लाख पीपीई आतापर्यंत पुरवली आहेत.

याशिवायदेशात निर्मिती करण्यात आलेले2 लाख एन 95 मास्कविविध रुग्णालयांना पाठवण्यात येत आहेत. यासह केंद्र सरकारने आतापर्यंत 20 लाखाहून अधिक एन 95 मास्क पुरवले आहेत. नव्याने आलेल्या साहित्यापैकीजास्त साहित्य, तामिळनाडूमहाराष्ट्र, दिल्ली, केरळ, आंध्रप्रदेशतेलंगणा आणि राजस्थान या मोठ्या संख्येने बाधित असलेल्या राज्यांना पाठवण्यात येत आहे. 

कोविड-19 वर मात करण्यासाठीच्या प्रयत्नातपीपीईचा परदेशातून पुरवठा सुरु होणे हा महत्वाचा टप्पा आहे. एन 95 मास्क सह80 लाख पूर्ण पीपीई संचांची ऑर्डर सिंगापूरच्या आस्थापनाकडे आधीच नोंदवण्यात आली आहेहा पुरवठा येत्या 11 एप्रिल पासून सुरु होईलअसे सूचित करण्यात आले आहेयेत्या 11 तारखेला 2 लाख तर त्यानंतरच्या आठवड्यात आणखी 8 लाख पीपीई मिळण्याची अपेक्षा आहे. 60 लाख संपूर्ण पीपीई संचाची ऑर्डर देण्यासंदर्भात चीन मधल्या कंपनीशी बोलणी अंतिम टप्प्यात आहेत. एन 95 मास्क आणि संरक्षक गॉगल यासाठी विदेशी कंपन्यांकडे स्वतंत्र ऑर्डर नोंदवण्यात आली आहे.

देशाअंतर्गत क्षमतेला जोड देण्यासाठीउत्तर रेल्वेने पीपीई विकसित केले आहे. ही पीपीईसंरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने याआधी विकसित केलेल्या व्यतिरिक्त आहेत.याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. सध्याच्या  एन 95 मास्क उत्पादकानीआपली क्षमता वाढवून  80,000 मास्क प्रतीदिन केली आहे. दर आठवड्याला सुमारे 10 लाख पीपीई संचाचा पुरवठा प्राप्त करणे हे उद्दिष्ट असून देशातल्या रुग्णांची संख्या पाहता सध्या पुरेशी संख्या उपलब्ध आहे. या आठवड्यात आणखी पुरवठा अपेक्षित आहे.

English Summary: Outsourced supplies of PPEs begin landing in India
Published on: 08 April 2020, 09:20 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)