News

देशातील सर्वात मोठा पपई उत्पादक जिल्हा म्हणून नंदुरबार जिल्ह्याला ओळखले जाते. नंदुरबार जिल्ह्यात जवळपास दहा हजार हेक्टर क्षेत्रावर पपईची लागवड केली जाते. पण मागील महिन्यात झालेल्या जास्त पाऊसामुळे पपई पिकांवर मोझ्याक व्हायरसचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी चिंतेत सापडलाय.

Updated on 07 October, 2023 12:03 PM IST

देशातील सर्वात मोठा पपई उत्पादक जिल्हा म्हणून नंदुरबार जिल्ह्याला ओळखले जाते. नंदुरबार जिल्ह्यात जवळपास दहा हजार हेक्टर क्षेत्रावर पपईची लागवड केली जाते. पण मागील महिन्यात झालेल्या जास्त पाऊसामुळे पपई पिकांवर मोझ्याक व्हायरसचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी चिंतेत सापडलाय.

मोझ्याक व्हायरसचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव -
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात जवळपास 4000 हेक्टर क्षेत्रावर पपईची लागवड केली जाते. मात्र यावर्षी शहादा तालुक्यात पपई उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे कारण पपईवर आलेल्या विषाणूजन्य रोगांमुळे पपईच्या झाडावरील पाने गळतात आणि पाने आकसतात. यामुळे फळे खराब होतात अशा फळांना व्यापारी खरेदी करत नसल्याने हाताशी आलेल पिक सोडुन देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

जिल्ह्यात जवळपास 3000 हेक्टर पेक्षा अधिक पपईवर या मोझ्याक व्हायरसचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. शेतकऱ्यांकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत तरी देखिल पपई पिकावरील संकट दूर होताना दिसत नाही. त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करून सर्व शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केले आहे.

English Summary: Outbreak of viral disease on papaya crop in Nandurbar district Farmers in trouble
Published on: 07 October 2023, 12:03 IST