News

यंदाच्या हंगामात उसाचे वाढते क्षेत्र तसेच वाढते उत्पादन आणि राज्यात सर्वात मोठा राहिलेला म्हणजे अतिरिक्त उसाचा प्रश्न चांगलाच शिगेला पोहचलेला आहे. सध्या महाराष्ट्र सर्वच गोष्टींबाबत आघाडीवर आहे. जे की मागील ५ महिन्यांपासून उसाचे गाळप सुरू असून १५ मार्च पर्यंत २८३ लाख टन साखरेचे उत्पादन निघाले आहे. मागील वर्षी २३ लाख टन वाढीव साखरेचे उत्पादन निघाले होते असे साखर आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. सध्या उसाचा हंगाम अंतिम टप्यात असताना सुद्धा देशातील जवळपास ४२५ कारखाने उसाचे गाळप करत आहेत. तर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र राज्यातील १३ साखर कारखान्यांनी हंगाम बंद केला असून देशातील एकूण उत्पादनापैकी १०८ लाख टन साखरेचे उत्पादन एकट्या महाराष्ट्र राज्यात झाले आहे.

Updated on 21 March, 2022 4:26 PM IST

महाराष्ट्राची आघाडी कायम :-

भारतात महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेश राज्यात सर्वाधिक जास्त साखरेचे उत्पादन घेतले जाते. यंदाच्या हंगामात ऑक्टोबर महिन्यापासून उसाचा गाळप हंगाम सुरू झाला. हंगामाच्या सुरुवातीपासून साखर उत्पादनात महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे. हंगाम जरी अंतिम टप्यात असला तरी राज्य हे आघाडीवरच आहे. मागील वर्षी मार्च महिन्यात राज्यात ९४ लाख टन साखरेचे उत्पादन निघाले होते. यंदाच्या हंगामात उसाचे क्षेत्र वाढले आहे तसेच अधिकचा उतारा पडला असल्याने उत्पादनात वाढ होत आहे. सध्याच्या स्थितीला राज्यामध्ये १८४ साखर कारखाने उसाचे गाळप करत आहेत. पुढील आठ दिवसात कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील कारखाने बंद होतील असा अंदाज आहे.

अतिरिक्त ऊसामुळे हंगाम लांबणार :-

पश्चिम महाराष्ट्रातील जरी येत्या आठ दिवसात कारखाने बंद होणार असतील तरी दुसऱ्या राज्यामध्ये अतिरिक्त उसाचा प्रश्न कायमच आहे. सध्या कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात उसाचा हंगाम अंतिम टप्यात आहे तसेच १३ कारखान्यांनी तर बंदच केले आहे. मराठवाडा, विदर्भ तसेच उत्तर भारतातील ऊस अजून फडातच आहे. साखर आयुक्त यांनी असे आदेश काढले आहेत की जो पर्यंत उसाचे पूर्ण गाळप होत नाही तो पर्यंत कारखाने चालू च ठेवावेत. जे की यंदा वाढलेल्या उसाच्या क्षेत्रामुळे काही भागातील हंगाम लांबणीवर पडणार असल्याचे चित्र दिसत आहे.

देशात 283 लाख टन साखर तयार :-

देशातील ५१६ कारखान्यांनी १५ मार्चपर्यंत २८३ लाळ टन साखरेचे उत्पादन काढले आहे. यंदा उसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले असल्याने साखर उत्पादनात वाढ झालेली आहे. मागील वर्षी याच महिन्यात २५९ लाख टन साखरेचे उत्पादन निघाले होते, जे की वाढत्या क्षेत्रामुळे उतारा ही चांगल्या प्रकारे मिळाला होता. महाराष्ट्र राज्याची यामध्ये महत्वाची भूमिका राहिलेली आहे. देशातील एकूण उत्पादनांपैकी एकट्या महाराष्ट्रात १०८ लाख टन उत्पादन काढले आहे.

English Summary: Out of the total production in the country, Maharashtra alone produces 108 lakh tonnes of sugar.
Published on: 21 March 2022, 04:26 IST