यावर्षी कांद्याला मिळाल्याने नाशिक जिल्हा आणि परिसरात कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड होत आहे. निसर्गाची अवकृपा असतानादेखील शेतकरी सगळ्या परिस्थितीवर मात करत कांदा लागवडीमध्ये व्यस्त आहेत.यावर्षीसंपूर्ण जानेवारी महिना पर्यंत कांदा लागवड चालेल अशा आशयाचेचित्र आहे.
मजुरांची टंचाई तरी कांदेलागवडीची कसरत….
कांदा लागवडीसाठी जास्त प्रमाणात मजुरांची आवश्यकता असते. मजुरांची टंचाई मोठ्या प्रमाणात भासत असून बाहेर गावावरून तसेच शेजारील मध्य प्रदेश राज्यातून मजूर आणून कांदा लागवड केली जात आहे. जर कांदा लागवडीचा विचार केला तर एका एकर लागवडीसाठी 10 ते 12 हजार रुपये मजुरी खर्च येतो.तसेच बाहेर गावावरून मजुरांचा नेआन करण्याचा खर्च देखील शेतकऱ्यांना करावा लागत आहे.
रोपांची टंचाई भासल्यानेइतर शेतकऱ्यांकडून त्यांनी लागवड करून उरलेले रोप विकत घेऊन लागवड पूर्ण करण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येतो. ही परिस्थिती पाहता या वर्षी इतर पिकांच्या तुलनेत कांदा पिकाची लागवड जास्त झाल्याने या वर्षी कांद्याचे विक्रमी उत्पादन निघेल असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
नगर जिल्ह्यातील या शेतकऱ्याने कांदा लागवडीसाठी केला कांदा प्लांटरचा प्रयोग…
नगर जिल्ह्यातील प्रवरा येथील शेतकरी नितीन दुस यांनी त्यांच्या पाच एकर कांद्याची लागवड ट्रॅक्टर प्लांटर द्वारे अवघ्या आठ दिवसात उरकली. मागच्या वर्षी पाच एकर कांदा लागवडीला त्यांना 28 दिवस लागले होते. यावर्षी त्यांनी कांदा प्लांटरचा उपयोग करून पूर्ण पाच एकर मधील कांदे लागवड संपवली. मागच्या वर्षी त्यांना एका एकराला पस्तीस मजूर लागले होते. म्हणजे पूर्ण पाच एकर कांदा लागवडीसाठी 175 मजूर लागले होते परंतु प्लांटर च्या साह्याने कांदा लागवड केल्याने अवघ्या 56 मजुरांमध्ये ही लागवड उरकली. (संदर्भ-मराठीपेपर)
Published on: 11 January 2022, 10:01 IST