उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामात अत्याधुनिक तंत्रज्ञानाने शेती करणे शक्य झाले आहे. यामागील कारण असे की उस्मानाबाद जिल्हा हा आकांक्षीत जिल्ह्यांमध्ये समावेश करतो. मात्र निती आयोग अंतर्गत कृषी विभागाद्वारे ज्या योजना राबवलेल्या होत्या त्या योजनांमध्ये या जिल्ह्याने उत्कृष्टपणे काम केले असल्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्याला ३ कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले आहे. जे की मिळालेल्या बक्षिसातून उस्मानाबाद जिल्ह्यातील जिल्हा प्रशासनाने आधुनिक यंत्राची खरेदी केलेली आहे. जे की या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आता उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकरी करत आहेत. शेतकऱ्यांना या तंत्रज्ञानाचा लाभ डीबीटी प्रणालीद्वारे मिळणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
उस्मानाबाद जिल्ह्याला ३ कोटी रुपयांचे बक्षीस :-
निती आयोगांतर्गत कृषी विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यात विविध प्रकारच्या योजना राबिवल्या आल्या होत्या. मग त्या योजनांमध्ये सूक्ष्म सिंचनाखालील क्षेत्रामध्ये वाढ करणे, तसेच प्रधानमंत्री पीकविमा योजना अशा प्रकारच्या अनेक महत्त्वाच्या योजना जिल्ह्यामध्ये राबिवल्या गेल्या होत्या जे की यामुळे उस्मानाबाद जिल्हा प्रशासनाला ३ कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले होते. जे की मिळालेल्या बक्षिसाचा लाभ हा शेतकऱ्यांसाठी करावा असा निर्णय पालकमंत्री शंकरराव गडाख तसेच जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी घेतलेला आहे. जे की या निर्णयाचा फायदा शेतकऱ्यांना खरीप हंगामात होणार आहे.
खरिपातील या पिकांना होणार फायदा :-
सध्या राज्यात खरिपाच्या अनुषंगाने शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. खरीप हंगामपूर्वीच शेतीची मशागतीची कामे सुरू झाली आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्याना खरीप हंगामात बीबीएफ या तंत्रज्ञानाचा वापर करता येणार आहे. बीबीएफ या तंत्राद्वारे शेतकऱ्यांना सोयाबीन, तूर, मुग, उडीद, तसेच कापूस, मका या पिकांचा रुंद वरंबा तसेच सरी या यंत्राद्वारे पेरणी करता येणार आहे. या यंत्रामुळे एकरला कमी प्रमाणत बियाणे तर लागतेच तसेच उत्पादनात देखील वाढ होते. जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी सांगितले आहे की बीबीएफ या यंत्राद्वारेच खरिपातील पेरणी करावी.
बक्षीस रकमेच्या माध्यमातून शेतीकामे :-
काळाच्या बदलानुसार जर शेतीव्यवसायत बदल केला तरच शेतीचे उत्पन्न वाढणार आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यानी बीबीएफ म्हणजेच ५०८ रुंद वरंबा, सरी यंत्राचा वापर तसेच बियाणांच्या प्रतवारीसाठी १५८७ स्पायरल सेपरेटर आणि १५०० स्थानिक बियाणे किटचे वाटप करावे लागणार आहे.
Published on: 28 April 2022, 02:00 IST