महाराष्ट्र शासन कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) भोर व निसर्गवलय युनिएग्रो यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी शिंपल्यांतुन मोती तयार करणे (मोत्यांची शेती) या विषयावर तीन दिवसीय निवासी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रशिक्षणातील विषय:
- मोत्यांची शेती म्हणजे काय?
- संधी आणि वाव.
- शास्त्रीयरित्या मोती संवर्धन.
- मोती संवर्धनासाठी आवश्यक बाबी.
- निगा आणि काढणी.
- विपणन व विक्री.
- शासकीय योजना व अनुदान.
- प्रत्यक्ष मोत्यांच्या शेतीला भेट इत्यादी.
वरील विषयांवर तज्ञ मार्गदर्शन करतील.
प्रशिक्षण कालावधी: 28 ते 30 डिसेंबर 2019.
वेळ: सकाळी 9 ते सायं 5 पर्यंत.
स्थळ: स्काउट्स आणि गाईड प्रशिक्षण केंद्र, भोर, जि. पुणे.
सदर प्रशिक्षणासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी आपली नाव नोंदणी दिनांक 20/12/2019 पर्यंत खाली दिलेल्या संपर्क क्रमांकावर करावयाची आहे. (प्रथम येणाऱ्यास प्राधान्य)
अधिक माहितीसाठी संपर्क:
9769 907 996 / 9527 269 988
Published on: 06 December 2019, 05:44 IST