News

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण द्यावे अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. याच पार्श्वभूमीवर जालन्यात उद्या 17 नोव्हेंबर रोजी ओबीसी नेत्यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेला आरक्षण बचाव एल्गार सभा असे नाव देण्यात आले असून 'जो ओबीसी हित की बात करेगा, वही देश पे राज करेगा' अशी टॅगलाईन देण्यात आली आहे.

Updated on 16 November, 2023 4:12 PM IST

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण द्यावे अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. याच पार्श्वभूमीवर जालन्यात उद्या 17 नोव्हेंबर रोजी ओबीसी नेत्यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेला आरक्षण बचाव एल्गार सभा असे नाव देण्यात आले असून 'जो ओबीसी हित की बात करेगा, वही देश पे राज करेगा' अशी टॅगलाईन देण्यात आली आहे.

मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण द्या अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली होती. त्यासाठी जालन्यात मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण सुरू केलं होतं. तसेच आता मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, ही त्यांची प्रमुख मागणी आहे. मात्र मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यास ओबीसी नेत्यांनी तीव्र विरोध केला आहे. छगन भुजबळ यांनी देखील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देता येणार नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे जालन्यातील अंबड तालुक्यातील पाचोड रोडवर आरक्षण बचाव एल्गार सभा आयोजित करण्यात आली आहे.

उद्या आरक्षण बचाव एल्गार सभेत मंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते विजय वेडट्टीवार, माजी मंत्री पंकजा मुंडे, आमदार गोपीचंद पडळकर, रासपचे प्रमुख महादेव जानकर यांच्यासह राज्यभरातील अनेक ओबीसी नेते उपस्थित राहणार आहेत.

English Summary: Organizing 'Reserve Rescue Elgar' meeting in Jalna tomorrow
Published on: 16 November 2023, 04:10 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)