News

परभणी: येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विस्‍तार शिक्षण संचालनालयाच्‍या वतीने दिनांक १८ मे रोजी विद्यापीठ वर्धापन दिनानिमित्‍त दरवर्षी खरीप शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन करून साजरा करण्‍यात येतो. परंतु यावर्षी कोरोना रोगाचा वाढता प्रादुर्भाव व राज्‍यात लॉकडाऊनच्‍या पार्श्‍वभुमीवर यावर्षीचा खरिप शेतकरी मेळावा रद्द करण्‍यात आला असुन ऑनलाईन कृषि संवाद कार्यक्रमाचे आयोजन सोमवार दिनांक १८ मे रोजी सकाळी ११.०० वाजता करण्‍यात आले आहे.

Updated on 17 May, 2020 9:02 AM IST


परभणी:
येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विस्‍तार शिक्षण संचालनालयाच्‍या वतीने दिनांक १८ मे रोजी विद्यापीठ वर्धापन दिनानिमित्‍त दरवर्षी खरीप शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन करून साजरा करण्‍यात येतो. परंतु यावर्षी कोरोना रोगाचा वाढता प्रादुर्भाव व राज्‍यात लॉकडाऊनच्‍या पार्श्‍वभुमीवर यावर्षीचा खरिप शेतकरी मेळावा रद्द करण्‍यात आला असुन ऑनलाईन कृषि संवाद कार्यक्रमाचे आयोजन सोमवार दिनांक १८ मे रोजी सकाळी ११.०० वाजता करण्‍यात आले आहे.

ऑनलाईन कृषि संवादात महाराष्‍ट्राचे कृषिमंत्री माननीय नामदार श्री. दादाजी भुसे हे विशेष अथिती म्‍हणुन सहभागी होऊन शेतकरी बांधवांना संबोधीत करणार आहेत. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू डॉ. अशोक ढवण राहणार असुन पुणे येथील अटारीचे संचालक डॉ. लाखन सिंग कार्यक्रमात प्रमुख सहभाग आहेत. या कार्यक्रमास शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. देवराव देवसरकर आदींचा सहभाग राहणार आहे. कार्यक्रमाचे आयोजन झुम मि‍टींग सॉफ्टवेअरच्‍या माध्‍यमातुन करण्‍यात येणार असुन शेतकरी बांधवानी झुम मिटींग सॉफ्टवेअर आपल्‍या मोबाईल मध्‍ये डाऊनलोड करून मिटिंग आयडी 382 912 7898 वर पासवर्ड 229000 टाकुन सहभाग नोंदवावा.

सदरिल कार्यक्रमात विद्यापीठ शास्‍त्रज्ञ खरिप हंगामातील कापुस, सोयाबीन, तुर लागवड तंत्रज्ञान व इतर कृषि तंत्रज्ञानावर मार्गदर्शन करणार असुन सहभागी शेतकऱ्यांच्या निवडक प्रश्‍नांना उत्‍तर देणार आहेत. तरी सदरिल ऑनलाईन कृषि संवाद कार्यक्रमात शेतकरी बांधवानी सहभागी व्‍हावे, असे आवाहन मुख्‍य विस्‍तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख, जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. संतोष आळसे, नाहेप प्रकल्‍पाचे मुख्‍य शास्‍त्रज्ञ डॉ. गोपाल शिंदे यांनी केले आहे. या संपुर्ण कार्यक्रमाचे प्रक्षेपण विद्यापीठाच्‍या युटयुब चॅनेल www.youtube/user/vnmkv वर उपलब्ध होणार आहे.

English Summary: Organizing online agricultural discussion on the 48th anniversary of parbhani agricultural university
Published on: 17 May 2020, 09:01 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)