स्वतंत्र्याची अमृत महोत्सव निमित्त आकाशवाणी महा निदेशालय नवी दिल्ली यांनी युवकांसाठी ‘एअर नेक्स्ट’या कार्यक्रमातून नवीन RJ’s आकाशवाणीवर संधी देण्यासाठी अकोला आकाशवाणी केंद्र व डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ यांचे विद्यमाने कृषी महाविद्यालय अकोला येथे वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.पि.के नागरे सर सहयोगी अधिष्ठाता कृषी महाविद्यालय अकोला. Program Chairman Dr.P.K Nagre Sir Associate Dean Agricultural College Akola. तसेच कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आकाशवाणी केंद्र अकोला चे कार्यक्रम प्रमूख श्री.विजय दळवी सर, व सुरेश गोळे सर यांची उपस्थिती होती .तसेच डॉ.एन एम काळे, डॉ. संजय कोकाटे डॉ.गीते सर डॉ
अनिल खाडे डॉ.चिकटे मॅडम, डॉ भगत, डॉ.अरुणा कटोले यांची उपस्थिती लाभली.वकृत्व स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी मोठे संख्येने सहभाग घेतला कृषी महाविद्यालय अकोला च्या आरती देशमुख व संपदा ढोके या दोन विद्यार्थिनींची देशपातळीवर निवड झाली आहे.
स्पर्धेमधये सुनैना भोयर, गंगासागर वैद्य, श्रेया सोनी, आचल इंगळे, साहिल मोगरे, प्रदीप चौधरी, नवीन फोगट या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालय व शिक्षक वृंदांकडून कौतुक केले जात आहे.
Published on: 05 September 2022, 08:49 IST