महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत कृषि महाविद्यालय अकोला येथे आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या कृषी व संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थी या महोत्सवात सहभागी झाले.युवा महोत्सवाचे उद्घाटन ११ ऑक्टोबर रोजी अध्यक्ष
डॉ.शरदराव गडाख,मा.कुलगुरू,डॉ.पं.दे.कृ.वि. अकोला यांच्या हस्ते डॉ.के आर ठाकरे सभागृह कृषी महाविद्यालय अकोला येथे करण्यात आले.Dr. K R Thackeray Auditorium was held at Agricultural College, Akola.
अकोला कृषी विद्यापीठाची शिवार फेरी: एक अलौकिक पर्वणी!
या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून डॉ.एस एस माने अधिष्ठाता डॉ पं.दे.कृ.वि.अकोला,डॉ डी.बी.उंदिरवाडे विस्तार शिक्षण संचालक डॉ.पं.दे.कृ.वि.अकोला, डॉ वाय बी तायडे अधिष्ठाता पदव्युत्तर संस्था डॉ. पं. दे. कृ.
वि.अकोला,डॉ पि.के.नागरे सहयोगी अधिष्ठाता कृषी महाविद्यालय अकोला डॉ. पं. दे.कृ. वि.अकोला,डॉ एस वडतकर सहयोगी अधिष्ठाता कृषी अभयांत्रिकी महाविद्यालय अकोला,डॉ. पं. दे.कृ.वि.अकोला, डॉ एम पंचभाई अधिष्ठाता उद्यानविद्या डॉ. पं. दे. कृ. वि. अकोला,डॉ हरणे सहयोगी अधिष्ठाता वनविद्या महाविद्यालय अकोला,डॉ. पं. दे. कृ.वि. अकोला , डॉ. एस.
हाडोळे विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ पं.दे.कृ.वि.अकोला, डॉ.एम. वी. तोटावार जिमखाना उपाध्यक्ष कृषी महाविद्यालय अकोला,प्रमोद पाटील नियंत्रक डॉ पं.दे.कृ.वि.अकोला व शैलेश ठाकरे विभागप्रमुख कृषी अभयांत्रिकी विभाग डॉ पं.दे.कृ.वि.अकोला आदी उपस्थित होते.कार्यक्रमात डॉ शरदराव गडाख कुलगुरू डॉ पं.दे.कृ.वि.अकोला,आपल्या भाषणात बोलतांना ते
म्हणाले भारत हा तरुणांचा देश आहे त्यादृष्टीने सर्व जग आपल्या कडे बघत आहे.आपणही आपल्या कलागुणांनी जग जिंकण्याची क्षमता ठेवावी.समोर ते मनाले ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध होत नाही अश्या विद्यार्थांच्या कलांना वाव मिळावा म्हणून युवा महोत्सवद्वारे एक व्यासपीठ उपलब्ध झाले.युवा महोत्सव या कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ. पि.के. नागरे सहयोगी अधिष्ठाता कृषी
महाविद्यालय अकोला यांनी केली.विद्यापीठातील शासकीय,संलग्नित खाजगी एकूण ३८ महाविद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थीनी वेगवेगळ्या ३७ स्पर्धामध्ये सहभागी झाले.युवा महोत्सवाच्या पहिल्या दिवशी साहित्यिक विभाग स्पर्धा जसे वादविवाद स्पर्धेत २१ , वक्तृत्व स्पर्धेत २०,कथा लेखन व संवाद स्पर्धेत ११, प्रश्नमंजुषा ९ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला . गायन स्पर्धा विभागात
शास्त्रीय संगीत, कवाली, नाट्यसंगीत वोकल, इत्यादी ११ प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या. फाइन आर्ट्स विभाग मध्ये आठ स्पर्धा रांगोळी,मेहंदी,चित्रकला, फोटोग्राफी,क्ले मॉडेलिंग, कॉर्तूनिंग अश्या वेगवेगळ्या स्पर्धेत ४३ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.उद्घाटन समारंभाप्रसंगी कुमारी स्नेहा पदव्युत्तर संस्था अकोला विद्यार्थीनी स्वागत नृत्य करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.युवा महोत्सवाचे संचालन डॉ प्रेरणा चिकटे तर आभार प्रदर्शन डॉ.एम वी तोटावार यांनी केले.
Published on: 13 October 2022, 02:18 IST