कृषी महाविद्यालय अकोला राष्ट्रीय सेवा योजना तर्फे तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षानिमित्त केंद्र सरकारने हर घर तिरंगा मोहीम राबवण्यात जनतेमध्ये जनजागृती करण्याकरता आवाहन केले आहे या आवाहनाला प्रतिसाद देत कृषी महाविद्यालय अकोला
येथे १३ ऑगस्ट रोजी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.A tricolor rally was organized here on August 13.रॅलीत सहभागी सर्व विद्यार्थी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या हातात भारताचा राष्ट्रध्वज मोठ्या दिमाखाने फडकत होता रॅली दरम्यान “भारत माता की जय”‚ “वंदे मातरम”‚ “हर घर तिरंगा घरघर तिरंगा” अशा घोषणा देण्यात आल्या.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून डॉ.नागरे सर सहयोगी अधिष्ठाता कृषी महाविद्यालय अकोला यांची उपस्थिती लाभली. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. एम. वी तोटावर सर डॉ एस. कोकाटे, डॉ अपुतिकर मॅडम, डॉ. दिवेकर, डॉ. डॉ वाकळे हे उपस्थित होते. डॉ कोकाटे यांनी विद्यार्थ्यांना तिरंगी झेंड्याचे
महत्व पटवून दिले. तसेच संपदा ढोके या विद्यार्थिनीने ”विर शहीद ” या विषयावर कवितेचे गायन केले.कार्यक्रमाला डॉ.अनिल.खाडे ,डॉ.प्रकाश गीते , डॉ. गिरीश जेउघाले , डॉ. वीरेंद्र ठाकूर, डॉ प्रकाश काहते ,प्रा.गोदावरी, डॉ दलाल, डॉ. अतुल झोपे, डॉ धुळे, डॉ. गणेश भगत, डॉ प्रशांत जोशी, प्रा. वाय.
सनाप, डॉ डी.एम.कणसे , प्रा.गोदावरी इत्यादि प्राध्यापक वृंदानची उपस्थिति लाभलि. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रुती नीचत हिने केले तसेच आभार प्रदर्शन आस्था देशमुख ने केले.कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. अनिल खाडे सर यांनी मार्गदर्शन केले व कार्यक्रम यशस्वीरित्या पार
पाडण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक कन्हैया गावंडे,आदेश घोडके,श्रुति नीचट ,सेजल वालशिंगे, देवेंद्र माने, प्रिया फड आस्था देशमुख, हर्षल ठाकरे, आयुशी झोडे,अभीश्री सुर्यवंशी, कविता चौके , पुनम आवचार ,यश दोडेवर, आदित्य जवंजाल व इतर विद्यार्थ्यानी परिश्रम घेतले.
संकलन - कन्हैया गावंडे.
Published on: 13 August 2022, 05:42 IST